सावकारांनी केली फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

नागपूर - कर्जाची परतफेड केल्यानंतरही जास्त रक्कम वसुल करण्यासाठी कर्जदाराचे घर हडपण्याचे योजना आखणाऱ्या २ सावकारांविरुद्ध हुडकेश्वर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. आरोपींमध्ये प्रभुदास मावजी पटेल(आंबेडकर चौक) आणि अनिल भाईलाल पटेल(लकडगंज) यांचा समावेश आहे. सूदर्शननगर निवासी जियाउल्ला अफजल हुसेन सिद्दिकी यांनी तक्रार दाखल केली आहे.

जानेवारी २००८ मध्ये जियाउल्ला यांनी आरोपींकडून ४ लाख रुपये उसणे घेतले होते. या बदल्यात आरोपींनी २०१४ पर्यंत त्यांच्याकडून ६.१८ लाख रुपयेही वसूल केले. १३ एप्रिल २०१८ ला आरोपींनी जियाउल्ला यांची भेट घेतली आणि ५३ लाख रुपये व्याज बाकी असल्याचे सांगितले. जियाउल्ला यांनी कर्जाची परतफेड केल्याचा दावा केला. १२ मे ला अनिल आणि प्रभुदास यांनी ३ गुंड त्यांच्या घरी पाठविले. त्यांना तत्काळ घर खाली करण्यास सांगितले. जियाउल्ला यांनी नकार दिला असता गुंडांनी घराची भिंत पाडली. कर्जाचा बहाना करून दोन्ही आरोपींनी त्यांचा भूखंड हडपण्याची योजना तयार केली होती. जियाउल्ला यांनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी प्रभुदास आणि अनिल विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.

Web Title: money lender looted fraud case in nagpur