अन् लग्नाचा खर्च दिला जलसंधारणासाठी

Akola
Akola

अकोला : हुंडा प्रथेला विरोध तसेच लग्नातील वारेमाप मिरवणूक, मंडप, मानपान यासारखा अनावश्यक खर्चला फाटा देत जिल्ह्यातील खिरपुरी बु. येथील आदर्श युवक आकाश दांदळे यांनी गावा शेजारीच असलेल्या बारलिंगा गावातील भीषण पाणीटंचाईची समस्या पाहता गाव पाणीदार होण्यासाठी जलसंधारणासाठी जवळपास एक लाखाची मदत दिली. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

‘लाथ मारीन तिथे पाणी काढीन’ अशी धमक पूर्वी देत होते. मात्र सद्या ज्या गावात पाणी आहे, अशा गावातच मुलगी द्यावी असा वधु पक्षाचा आग्रह असल्याने कुणी आपली लेक अशा कोरड्या गावांत द्यायलाही तयार नाही. अशी भीषण परिस्थित जिल्ह्यात आहे. बाळापूर तालुक्यातील खिरपुरी गावातील प्रतिष्ठित नागरिक नारायणराव दांदळे हे त्यांचा मुलगा आकाश याचा विवाह थाटामाटात करण्याचे स्वप्न उराशी बाळगून होते, परंतु दुष्काळावर मात करण्यासाठी तसेच परिसरात निर्माण झालेली पाणीटंंचाई लक्षात घेता लग्नाला येणारा खर्च हा जलसंधारण कामासाठी देण्याचे ठरविले.

त्यानुसार त्यांनी आखणी करीत बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील जनूना येथील श्री. अनिल अरविंद पाटील यांची कन्या चि.सौ.का. निशा हिच्यासोबत शनिवारी (ता.२७) अत्यंत साध्या पद्धतीने विवाह लावून दिला व लग्नाला होणारा अनाठायी खर्च रुपये एक लाख रुपये त्यांनी बारलिंगा येथील सरपंच गजानन पाटील व सहकाऱ्यांना सुपूर्द केले. पाण्यासाठी वणवण करण्यापेक्षा आताच नियोजन केले तर गावच पाणीदार होईल, या समजुतीने नव्या वधूनेही संमती दर्शवली.

बारलिंगा गाव दुष्काळाच्या छायेत
या गावात पाण्याची भीषण समस्या आहे. गावाच्या आजूबाजूला असलेल्या विहिरी कोरड्या पडल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली. पिण्याचे पाणी ग्रामस्थांना विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी गावातील नागरिक जिवाचे रान करीत असल्याचे दिसून येत असले तरी नवदाम्पत्याने केलेली मदत ही वाखान्या जोगी आहे. नव वधूवर यांनी अत्यंत साध्या पद्धतीने लग्न करून मिरवणूक, मंडप, मानपान यासारखा अनावश्यक खर्च टाळून लग्नकार्यास येणाऱ्या खर्चाची रक्कम ही जलसंधारणासाठी मदत स्वरूपात देऊन या नवदाम्पत्याने सामाजिक बांधीलकी जोपासली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com