कोतवालांना चतुर्थश्रेणी द्या!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

नागपूर - राज्यातील कोतवालांना चतुर्थश्रेणी बहाल करावी. तसेच त्यांना तलाठी व तत्समपदासाठी २५ टक्‍के पदोन्नती देण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील शेकडो कोतवाल आज विधानभवनावर धडकले. त्यांनी टेकडी रोडवर ठिय्या मांडत शासनाविरोधी निदर्शने केली. या मोर्चाच्या शिष्टमंडळाला रात्री साडेसातला महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट दिली. त्यांनी एक महिन्याचा वेळ मागून कोतवालांसाठी सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. त्यानंतर कोतवालांचा मोर्चा टेकडीरोडवरून उठला.

महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धडक दिली. मोर्चाचे नेतृत्व राज्याध्यक्ष संजय धरम, प्रवक्‍ता प्रवीण कर्डक यांनी केले. टेकडी रोडवर मोर्चा थांबला. सायंकाळच्या सुमारास महसूलमंत्र्यांनी मोर्चाची दखल घेतली. त्यांचे शिष्टमंडळाने मंत्र्यांची भेट घेऊन समस्या मांडल्या. महिन्याभरात बैठक बोलावून निर्णय देण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर कोतवालांना समाधान मानल्याची प्रतिक्रिया प्रवीण कर्डक यांनी दिली. कोतवाल संघटनेने मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण करण्याचा आक्रमक पवित्रा घेतला होता. कोतवालांच्या निवेदनांची फाइल शासनाने ४० वर्षांपासून लालफितीत अडकवून ठेवली होती. यापूर्वीही चंद्रकांत दादा पाटील यांनी कोतवालांना तोंडी आश्‍वासन दिले होते. मात्र, आता कोतवाल संघटनेने लेखी पूर्तता करण्याची विनंती केली आहे. राज्यात केवळ १२ हजार ६३७ कोतवाल कार्यरत आहे. केवळ ५ हजार तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहेत. कोतवालांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन लागू करावी. तसेच मृत्यूनंतर वारसांना नोकरी देण्यात यावी, वाळू तस्करांकडून कोतवालांवर होणारे हल्ले पाहता, कडक कायदा करण्यात यावा. अशा विविध मागण्या यावेळी कोतवालांनी केल्या होत्या.

Web Title: monsoon session kotwal rally