पावसाळी अधिवेशन अखेर नागपूरलाच 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

नागपूर - शिवसेना व अधिकाऱ्यांचा विरोध असतानाही राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या चार जुलैपासून नागपुरातच होणार असल्याचे स्पष्ट झाले. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी विधिमंडळाची बैठक नागपूरला होणार असल्याचे निर्देश दिले आहेत.

मार्च महिन्यात अर्थसंकल्पी अधिवेशन संपल्यानंतर चार जुलैपासून अधिवेशन होणार असल्याचे स्पष्ट केले होते; परंतु अधिवेशनाला एक महिन्याचा कालावधी शिल्लक राहिलेला असतानाही अधिवेशन नेमके कुठे होईल, याबद्दल स्पष्टता नव्हती. पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्याबद्दल मुख्यमंत्री आग्रही होते; परंतु याला शिवसेनेचा विरोध होता. विधिमंडळ व काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्याला विरोध केल्याचे समजते; परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिवेशन नागपूरला घेण्यासाठी आग्रही होते. त्यामुळे आता अधिवेशन नागपूरलाच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज राज्यपालांनी राज्यघटनेच्या अनुच्छेद १७४ खंड (१)द्वारे मिळालेल्या अधिकारानुसार राज्य विधिमंडळाचे अधिवेशन नागपूरला घेण्याचे ठरविले आहे.

Web Title: monsoon session in Nagpur