मूकबधिर युवतीने आत्मसात केली "आयटी'ची भाषा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मे 2019

नागपूर : "प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे' ही उक्ती नागपूरच्या रश्‍मी चरडेने खरी करून दाखविली आहे. इच्छाशक्तीच्या बळावर तिने चक्क सॉफ्टवेअर अभ्यासक्रमात प्रवेश मिळविला. अवघ्या महिनाभरातच "आयटी'ची भाषा अवगत केली. "एक्‍सिलंट कोडर' म्हणून स्वतःला सिद्धही केले. या बळावर क्‍लेरिक टेक्‍नॉलॉजीने तिला जॉब ऑफर करीत नियुक्तिपत्रही दिले आहे.

नागपूर : "प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेल ही गळे' ही उक्ती नागपूरच्या रश्‍मी चरडेने खरी करून दाखविली आहे. इच्छाशक्तीच्या बळावर तिने चक्क सॉफ्टवेअर अभ्यासक्रमात प्रवेश मिळविला. अवघ्या महिनाभरातच "आयटी'ची भाषा अवगत केली. "एक्‍सिलंट कोडर' म्हणून स्वतःला सिद्धही केले. या बळावर क्‍लेरिक टेक्‍नॉलॉजीने तिला जॉब ऑफर करीत नियुक्तिपत्रही दिले आहे.
दिव्यांग असणाऱ्या रश्‍मीने कधीही न्यून बाळगले नाही. केशवनगर शाळेतून तिने दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. पुढे विदर्भ बुनियादी शाळेतून बारावी उत्तीर्ण केली. तत्पश्‍चात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची कला शाखेतील पदवी मिळविली. प्रारंभीपासूनच तिला संगणक हाताळायला त्याचप्रमाणे लोकांना मदत करायला फार आवडते. लग्नानंतर संसाराची घडी नीट बसविण्याची अन्य मुलींप्रमाणेच तिची धडपड सुरू असतानाच संगणकावरील प्रेमही कायम आहे. एकएक दिवस पुढे जात असतानाच "क्‍लेरिक टेक्‍नॉलॉजी'ची जाहिरात हातात पडली. या कंपनीने देशातील पहिले आयटी एक्‍सपिरियन्स डेव्हलपमेंट सेंटर सुरू केले आहे. त्यात कोणत्याही शाखेच्या ग्रॅज्युएटला सॉफ्टवेअर कंपनीत प्रशिक्षणासह कामाची संधी असल्याचे त्यात नमूद होते.
जाहिरात बघताच रश्‍मीनेही अर्ज करण्याचा निर्णय केला. मुलाखतीच्या दिवशी अन्य उमेदवारांसह तीसुद्धा कंपनीच्या कार्यालयात हजर झाली. मूकबधिर युवती मुलाखतीसाठी आल्याचे बघून मुलाखत घेणाऱ्यांनाही धक्का बसला. त्यांनी इशाऱ्यातूनच "तू हे करू शकतील काय'? असा प्रश्‍न केला. तिने कागदावर "I want to become software engineer, please give me a chance' लिहून "रिप्लाय' दिला. तिच्यातील आत्मविश्‍वास बघून मुलाखतकर्त्यांनीही तत्काळ तिला संधी देण्याचा निर्णय घेतला.
अन्य विद्यार्थ्यांसोबत तीसुद्धा सॉफ्टवेअर कंपनीसाठी आवश्‍यक अभ्यास गिरवित आहे. गरज लक्षात घेऊन 2-3 शिक्षक तिच्याकडे विशेष लक्ष देतात. जिद्द, परिश्रम आणि चिकाटीच्या बळावर अवघ्या महिनाभरातच आयटी क्षेत्रातील अनेक महत्त्वपूर्णबाबी आत्मसात केल्या आहेत. क्‍लेरिक टेक्‍नॉलॉजीमुळेच हे घडू शकले, अशी तिची भावना आहे.
महिनाभरातच नियुक्ती
कॅम्पस इन्टरव्ह्यूमधून जॉब मिळावा यासाठी विद्यार्थ्यांचा आटापिटा असतो. मात्र, मोजक्‍याच विद्यार्थ्यांना जॉब ऑफर होतो. तसे भाग्य रश्‍मीला लाभले आहे. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्याच्या अवघ्या महिनाभरातच क्‍लेरिक टेक्‍नॉलॉजीने जॉब ऑफर करून नियुक्तिपत्रही दिले आहे. जीवनातील पहिलेच पॅकेज दीड लाखांचे असणार आहे. अर्थात एक्‍सपिरियन्स डेव्हलपमेंट सेंटरमध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येकालाच नोकरीची हमी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mookabirdhara got "IT language"