मोर्शी मतदारसंघाला तिसऱ्यांदा मिळाला मंत्रिपदाचा बहुमान

डॉ. अनिल बोंडे
डॉ. अनिल बोंडे

वरुड : वरुड-मोर्शी मतदारसंघाचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांना मंत्रिपद मिळाल्याने तिसऱ्यांदा मंत्रिपदाचा बहुमान या मतदारसंघाला मिळाला आहे. यापूर्वी दोघांना मंत्रिपदाची लॉटरी लागली होती.
मोर्शी मतदारसंघाला 1962 साली प्रतापराव देशमुखांच्या रूपाने पहिले आमदार मिळाले होते. त्यानंतर 1967 साली के. डब्लू. वामन, 1972 मध्ये मल्हारराव माहुलकर हे आमदार झाले. 1974 मध्ये मल्हारराव माहुलकरांना मंत्रिपद मिळाले व या मतदारसंघाला पहिल्यांदाच मंत्रिपदाचा बहुमान मिळाला. त्यांच्यावर ऊर्जा राज्यमंत्री पदाची जबाबदारी आली होती. त्यानंतर महादेवराव आंडे, कोकिळाताई गावंडे, पुरुषोत्तम मानकर हे आमदार झाले. 1990 मध्ये हर्षवर्धन देशमुख आमदार झाले. 1995 मध्येही त्यांनी आमदारकी राखली. 1996 मध्ये मतदारसंघाला पुन्हा मंत्रिपदाचा बहुमान मिळाला. हर्षवर्धन देशमुख यांना कृषी मंत्रिपद मिळाले. मतदारसंघाला त्यांच्या रूपाने दुसऱ्यांदा मंत्रिपद मिळाले. ते कॅबिनेट मंत्री होते. त्यानंतर 1999 मध्ये नरेशचंद्र ठाकरे आमदार म्हणून निवडून आले. 2004 मध्ये पुन्हा हर्षवर्धन देशमुख निवडून आले. 2009 व 2014 मध्ये डॉ. अनिल बोंडे यांनी या मतदारसंघात बाजी मारली. आज डॉ. अनिल बोंडे यांना मंत्रिपद मिळाल्याने तिसऱ्यांदा या मतदारसंघाला मंत्रिपदाचा बहुमान मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com