माताच बनली वैरीण; अर्भकाची विल्हेवाट

The mother became a virgin
The mother became a virgin

यवतमाळ : तारुण्यात शारीरिक आकर्षणातून वाट चुकल्यास कुमारी मातेचा कलंक लागून समाजात बदनामी होण्याची भीती असते. ही वेळ येऊ नये म्हणून अनेकदा अनैतिक संबंधातून जन्मास आलेल्या नवजात अर्भकाची विल्हेवाट लावली जाते.
पुसद येथील जिजामाता कन्या शाळेजवळ शनिवारी नवजात मृत अर्भक फेकून दिल्याचे आढळून आले. घटनेची वार्ता पसरताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. जनाबाई दरणे (रा. तुकाराम वॉर्ड) या महिलेने पोलिसात तक्रार दिली. त्यावरून पुसद शहर पोलिसांनी अनोळखी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला. अनैतिक संबंधातून जन्मास आलेल्या अपत्याची ओळख लपविण्यासाठी अर्भकाची विल्हेवाट लावल्याचा संशय आहे. मनदेव येथेही काही महिन्यांपूर्वी अशाचप्रकारे अर्भक आढळले होते. प्रेमसंबंधातून हे अर्भक जन्मास आल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते.
पांढरकवडा येथून यवतमाळला आलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये मृतावस्थेत अर्भक आढळले होते. "ती' महिला पांढरकवडा येथील बसस्थानकात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. मात्र, पुढे काय झाले, हे गुलदस्त्यातच आहे. 15 दिवसांपूर्वी तलाव फैलात जिवंत स्त्री जातीचे अर्भक उकिरड्यावर फेकून दिल्याची घटना उघडकीस आली. सुदैवाने उपस्थित नागरिक व पेट्रोलिंगवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी त्या अर्भकास वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. वारंवार उघडकीस येणाऱ्या या घटना समाजात चिंतेचा विषय ठरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com