Mother Found Alive After Last Rites
esakal
वर्षभर शोधूनही आईचा ठावठिकाणा लागत नाही... अखेर ती आता या जगात नाही, असे मनाला समजावून कुटुंबीयांनी तिची तेरावी केली. कपडे खड्ड्यात ठेवून प्रचलित परंपरेनुसार समाधी बांधली आणि गावजेवणही दिले. मात्र, नियतीने या कुटुंबासाठी वेगळीच कहाणी लिहून ठेवली होती. वर्षभरानंतर सोशल मीडियावर आलेल्या एका व्हिडिओने मृत समजलेल्या आईच्या जिवंत असल्याची बातमी दिली आणि कुटुंबीयांच्या डोळ्यांतील अश्रू दुःखाचे न राहता आनंदाचे झाले.