पूजा चव्हाणच्या मृत्यूबद्दल अद्याप कुणीही सहानुभूती व्यक्त केलेली नाही; आई जगदंबेला घातले साकडे

Mother Jagdambas Sakade for the justice of pooja chauhan Yavatmal news
Mother Jagdambas Sakade for the justice of pooja chauhan Yavatmal news

यवतमाळ : पूजा चव्हाणच्या मृत्यूबद्दल अद्याप कुणीही सहानुभूती व्यक्त केलेली नाही. तिला न्याय मिळावा यासाठी आम्ही पुढे आलो आहे. पोहोरादेवी येथील जगंदबा मातेला साकडे घातल्याची माहिती मुबंई येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा स्वंयम महिला मंडळांच्या योगिता साळवी यांनी शनिवारी यवतमाळ येथे पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी त्यांच्यासोबत सिद्धी महिला मंडळाच्या अध्यक्ष स्मिता कवडे, दिशा ज्योत फाउंडेशनच्या अध्यक्ष ज्योती साठे उपस्थित होत्या. पूजा चव्हाण प्रकरणातील आतापर्यंत समोर आलेले पुरावे वनमंत्री संजय राठोड यांच्या भोवती फिरत आहेत. त्यामुळे ते दोषी दिसत आहेत.

त्यामुळेच अजूनही सत्ताधाऱ्यांकडून पोलिसांवर तपासासाठी दबाव आहे. पूजाच्या रूपाने युवा नेतृत्व पुढे आले असते. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे पूजाला न्याय मिळावा यासाठी आम्ही पोहोरादेवी येथे जावून देवीला साकडे घातल्याचे साळवी म्हणाल्या.

दोषीला वाचविण्यासाठी सरकार प्रयत्नशील

दोषीला वाचविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे या प्रकरणात आता सामाजिक संघटनांनी पुढे येणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. राज्यातील सर्व सामाजिक संघटनांना एकत्र आणून लढा उभारण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही साळवी यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com