मातृभाव सर्वव्यापक व्हावा - सुमित्रा महाजन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 डिसेंबर 2016

नागपूर - मातृत्वाची कल्पना ही केवळ स्त्री पुरूष एवढी मर्यादित नाही. सर्वांमध्ये मातृभाव जागृत होणे व तो सर्वव्यापक असणे हे मातृत्वाला अभिप्रेत असल्याचे प्रतिपादन लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी शनिवारी नागपूर येथे केले. 

रेशीमबाग मैदानात धर्मसंस्कृती महाकुंभ अंतर्गत विश्‍वमांगल्य सभेद्वारे आयोजित ‘मातृसंसद’ कार्यक्रमात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.
मातृत्व शब्दाची कल्पना करताना त्यामध्ये पोषण, संरक्षण, संवर्धन, संस्कार या सर्व गोष्टींचा भावार्थ समाविष्ट होतो. 

भूमी या शब्दात भूमातेला जननी मानण्याची भावना फक्‍त भारत देशामध्येच  संस्कारामुळे दिसते. त्यामुळे, मातृत्वाची कल्पना ही सर्वव्यापक आहे. महिलांमध्ये मातृत्व स्वभावत:च असते, असेही महाजन म्हणाल्या. शेतकरी, मजदूर यांचा उल्लेख करताना स्त्रियांना वगळता येत नाही, कारण आता अर्ध्यापेक्षा जास्त महिला शेतीमध्ये काम करतात. सामान्य गृहिणी आपल्या परिवाराला योग्य दिशा देण्याचे कार्य करून एका सारथीची भूमिका सक्षमपणे बाजवत असल्याचे सुमित्रा महाजन यांनी आवर्जून सांगितले. कार्यक्रमाला संतवृद्य, विविध पिठांचे पीठाधीश, विश्‍वमांगल्य सभेचे पदाधिकारी व देशाच्या विविध भागांतून आलेले भाविक, नागरिक उपस्थित होते.

राष्ट्रकल्याणाची जबाबदारी सांभाळावी 
भारतीय संस्कृतीत स्त्रियांचे कर्तृत्व व सौंदर्यापेक्षा तिच्या मातृत्वाची श्रेष्ठता जास्त मानली जाते. मातृत्वाचा सन्मान हा सर्वोच्च मानला जातो. महिलांनी कुटुंबाप्रमाणेच समाज व राष्ट्राच्या कल्याणासाठी जबाबदारीसुद्धा सांभाळली पाहिजे. स्त्रियांच्या वात्सल्यामुळे त्यांना बहुआयामी कार्य करण्याचे सामर्थ्य मिळत असते. त्यामुळेच त्या सर्व परिवाराचे पालन पोषण करण्यास तयार असतात. मातृसंसदेच्या माध्यमातून महिलांचे संबोधन, सशक्‍तीकरण व परिवार प्रबोधन करण्याची आवश्‍यकता आहे, असे  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले.

Web Title: Motherhood to be ubiquitous