Mothers Day : शतकाच्या उंबरठ्यावरील रमाबाईने सांभाळलं एकत्र कुटुंब; चौथ्या पिढीचा सुखाने संसार

Mothers Day
Mothers Day

- मनोज भिवगडे

अकोला : शहरातील राजराजेश्वर मंदिराच्या भागात मांडेकर परिवाराची चौथ्यी पिढी एकाच घरात आजही वास्तवात आहे. स्व. रामभाऊ बळीराम मांडेकर यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी ग. भा. रमाबाई ९८ वर्षातही स्वाभिमानाचे धडे देत पाचमुले आणि पाच सुना यांच्या सहवासात एकत्र कुटुंबात आयुष्याच्या उत्तरार्धात आनंदाने संसार करीत आहेत.

कुटुंबाचा कर्तापुरुष म्हणून ज्येष्ठ मुलगा महादेव याच्या नेतृत्वात तिसऱ्या पिढीतील नऊ मुला-मुलीचे विवाह थाटात झाले. कुटुंबाचा गोतावळाने मोठा आकार घेतला असून, सहा मुली मुंबई, पुणे, कारंजा, चंद्रपूर, हिंगोली, अकोट येथे आनंदाने नांदत आहेत. तीन मुले सुनासह त्यांच्या नवविचाराने संसार फूलवत आहेत. चौथ्या पिढीत सात नाती आणि सहा नातू अशी पिढी रममय झालेली दिसून येते. ( Breaking Marathi News)

कुटूंबप्रमुख महादेव यांच्या नियंत्रनात कुटुंबाने एकत्रीत कार्यपध्दती स्वीकारली असून, पुरूषोत्तम यांना गोपाल सहकार्य करीत जयहिंद चौकातील दुर्गा सौभाग्य भंडार या प्रतिष्ठानचा कार्यभार हाताळतात. घरातील मुख्यव्यवसायला घरातील ज्येष्ठ महिला लताबाई, दाबाई यांच्या मार्गदर्शनात, सीमा, शिला, वर्षा अग्रक्रमाने सिझनच्या वेळी व नियमित भरीव सहकार्य करतात.

एकत्र कुटुंब परिवारात जीवनातील मार्गदर्शक दिशा व नैतिक मुल्याची जोपासना होत असून सुखदु:खाचे आदान-प्रदान होत असताना जीवनकार्याची उत्तम दिशा प्राप्त होते. यामध्ये सध्याच्या नवपिढीच्या स्वहित, आर्थिक प्राधान्य धाोरणामुळे संयुक्त कुटुंबाला तडा जात आहे. याकडे कुटुंबाने दुर्लक्षित धोरण ठेवून, त्यागमय वृत्तीने, वास्तव स्थितीनुसार कार्य करण्याची पध्दत अंगिकारल्याची दिसून येते. (Latest Marathi News )

शेती, शिक्षण क्षेत्रात कुटुंबाचे योगदान

परिवारातील गोपाल हे शेती सांभाळत जिल्हातील सेवा ससायटीच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत. परिवारातील सर्वात धाकटे असलेले ज्ञानेश्वर शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. वडिलांचा वसा अंगिकारत त्यागमय वृत्तीने कार्यकरीत अन्याय, चुकीच्या बाबीना थारा न देता प्रामाणिकता, विश्वासहर्ता, परोपकार, न्यायवृत्ती या मूल्यांचे अंगिकार करून परिवाराचा डोलारा वैभवी फुलत आहे. परिवारात दरवर्षी २१ मे रोजी वडिलाचा पुण्यतिथी सोहळा संताच्या छायेत करण्यात येते.

अडीअडचणींवर मात करून मूल्यांची जोपासना

एकत्र परिवारातून जीवनातील अनेक बहुमोल मूल्ये रुजविले जात आहे. त्यतून अनेक कठिण प्रसंगावर मात करता येते. ज्येष्ठांची सेवा सहज होते. सहजानंदासह परमानंद प्राप्त होतो. त्यामध्ये त्यागभावना ही उच्चदर्जाची असते. परिवारात आर्थिक विषयामुळे भरपूर समस्या, अडचणी उद्भवतात. यावेळी जीवनातील अंतिम सत्य हे कर्मानुसार श्रेष्ठ असल्याने कर्तव्यास प्राधान्य दिल्यास जीवनातील न्यायाचा आनंद उपभोगता येतो. जीवनातील चढ-उतार ही सहज वृत्तीने स्वीकारण्याची पध्दत अंगिकारण्यात येवून परिवारातील सदस्य जीवनातील कार्यास प्राधान्य देवून कार्य करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com