आधी म्हणाले ‘घरी रहा, सुरक्षित रहा’ आता म्हणतात वीज बिल भरा; कस शक्य आहे?

प्रतीक मकेश्वर
Sunday, 8 November 2020

तीन महीने घरात सुरक्षित असलेली गरीब जनता हजारो रुपयांचे वीज बिल भरण्यासाठी पैसे कोठून आणणार असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सागर भवते यांनी उपस्थित केला. महावितरणच्या अभियंत्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने कार्यकर्त्यांनी तिथेच आंदोलन केले.

तिवसा (जि. अमरावती) : लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल झाले असून, सर्वांचा रोजगार ठप्प होता. सर्व नागरिक आपल्या घरात सुरक्षित होते. त्यामुळे उत्पन्नची साधने बंद होती. कोरोना काळातील तीन महिन्यांचे वीज बिल सरसकट माफ करावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महावितरण कार्यालयात आंदोलन करण्यात आले.

कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सर्वत्र लॉकडाउन होते. सरकारने सर्वांना ‘घरी रहा, सुरक्षित रहा’ असे आवाहन केले होते. त्यामुळे सर्वसामान्य जनता आपला रोजगार बंद ठेवत घरात होती. आशा परिस्थितीमध्ये महावितरणने हजारो रुपयांचे वीज बिल गरीब सर्वसामान्य जनतेच्या हातात दिल्याने कामगार व मजूर वर्ग हतबल झाला आहे.

सविस्तर वाचा - सतत ॲसिडिटीचा त्रास होतो? आहारात करा पुढील बदल; फरक नक्की जाणवेल

तीन महीने घरात सुरक्षित असलेली गरीब जनता हजारो रुपयांचे वीज बिल भरण्यासाठी पैसे कोठून आणणार असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सागर भवते यांनी उपस्थित केला. महावितरणच्या अभियंत्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने कार्यकर्त्यांनी तिथेच आंदोलन केले. गरीब सर्वसामान्य जनतेप्रती महावितरणने सहानुभूती दाखवून लॉकडाऊनच्या काळातील पूर्णतः वीज बिल सरसकट माफ करावे अशी मागणी याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीने केली.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सागर भवते यांच्यासह सतीश यावले, तालुका अध्यक्ष सुमित सोनोने, प्रा. पंकज कांबले, राजकुमार आसोडे, गजानन आसोडे, सागर तेलमोरे, कल्पेश कालबंदे, अभिलाष हाडेकर, सागर काले, सुभाष आसोडे, अरविंद आसोडे, अक्षय बूतले, स्वप्नील पाटील, प्रणय कापसे, सिद्धार्थ कतारने, राहुल गोपाले, अनिल सोनोने, बबलू मुन्द्रे, निरंजन मंडले, भगवान बंसोड, प्रशिक कापसे, मुस्ताक शहा, प्रवीण निकालजे सह कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Movement of deprived Bahujan Aghadi in MSEB