नरेंद्र, देवेंद्र बेरोजगारीचे केंद्र; राष्ट्रवादी युवककडून पकोडे तळणे आंदोलन

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 जून 2019

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने आज (ता.28) वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात पकोडे (भजी) तळून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. तळलेले पकोडे (भजी) अमरावतीचे जिल्हाधिकारी यांना बेरोजगारीचा निषेध म्हणून देण्यात आले.

अमरावती : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने आज (ता.28) वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात पकोडे (भजी) तळून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. तळलेले पकोडे (भजी) अमरावतीचे जिल्हाधिकारी यांना बेरोजगारीचा निषेध म्हणून देण्यात आले.

यावेळी ​राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सूरज चव्हाण, निखिल ठाकरे, गजानन रेवाळकर, संदीप किटे, ऋषीकेश वैद्य, विनय कडू, रणजित काळबांडे, आशिष मानकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांना वाढत्या बेरोजगारी संदर्भात यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून निवेदन देण्यात आले. आतापर्यंत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे हे पाचवे विभागीय आंदोलन असून, या आंदोलनात अनेक बेरोजगार मोठ्या प्रमाणात सामील होत आहेत. सरकारच्या विरोधात या आंदोलनातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून प्रचंड असंतोष व्यक्त करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात 8 कोटींची गुंतवणूक आणि 60 लाख युवकांना रोजगार देऊ असे सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र एक ही रुपयांची गुंतवणूक झाली नाही. तसेच रोजगारनिर्मिती देखील झाली नाही. निवडणूक जवळ आल्यावर सरकारी नोकर भरतीची घोषणा होते पण अंमलबजावणी मात्र शून्य असल्याचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Movement by NCP over BJP Government