Truck Cabin Catches Fire in Sindkhed Raja
Sakal
विदर्भ
Buldhana News : सिंदखेड राजा येथे धावत्या ट्रकला आग ; जीवितहानी टळली!
Truck Fire : सिंदखेड राजा जालना रस्त्यावर धावत्या ट्रक च्या केबिनला अचानक आग लागल्याची घटना घडली असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे.ट्रकची केबिन पूर्ण पणे जळून खाक झाली आहे
सिंदखेड राजा : ट्रक मध्ये असलेली सोयाबीन माल थोडक्यात बचावला आहे.अहिल्यानगर जाणारा ट्रक क्रमांक एम एच १५1एफव्ही २५२७ हा जालना रोडवर असलेल्या जिजाऊ सृष्टी येथून जात असताना केबिन मधून अचानक धूर निघू लागला चालकाच्या लक्षात न आल्यामुळे ट्रक पुढे चालू राहिला परंतु काही वेळातच आग लागल्याचे लक्षात येतात ट्रक चालक रवींद्र बनकर यांनी तात्काळ ट्रक रस्त्याच्या बाजूला थांबून बाहेर उडी घेतली चालकाने तात्काळ पोलीस विभाग व अग्निशामक दलाशी संपर्क साधला सिंदखेड राजा पोलीस,समृद्धी महामार्ग नियंत्रण कक्ष,नगरपरिषद अग्निशामक दल काही वेळेतच घटनास्थळी दाखल झाले.

