'दाढी वाढवून कोणी रवींद्रनाथ टागोर बनू शकत नाही, त्यासाठी तसं हृदयही लागतं'

अतुल मेहेरे
Friday, 25 December 2020

शेतकऱ्‍यांसमोर, मजुरांसमोर मोठ्यात मोठ्या ताकदीचा टिकावे लागत नाही. जर का हे कायदे मागे घेतले नाही तर संपूर्ण देशाचं नुकसान होईल, असेही खासदार धानोरकर म्हणाले. 

चंद्रपूर : मोदी सरकार आमच्या नेत्यांना घाबरवत आहे. त्यामुळेच पोलिसांना पुढे करून राजकारण करीत आहे. शेतकऱ्याच्या न्याय्य हक्कासाठी व लोकशाही वाचविण्यासाठी आम्ही संघर्ष करत राहू. फक्त दाढी वाढवून कोणी रवींद्रनाथ टागोर बनू शकत नाही. त्यासाठी तसं हृदयही लागतंय, असा टोला खासदार बाळू धानोरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता लगावला.  

हेही वाचा - Success Story: केली अवघ्या १५ हजारांची गुंतवणूक अन् झाले कोटींचे मालक; युवा...

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरीविरोधी काळ्या कायद्याच्या विरोधात देशातील २ कोटी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या राष्ट्रपतींना देण्यासाठी निघालेल्या काँग्रेसच्या शिष्टमंडळाला पोलिसांनी ताब्यात घेतले. मोदी आणि भाजप ज्या विचारसरणीतून येतात, त्या विचारसरणीची परंपरा दडपशाहीची आहे. मात्र, आम्हीही अशा परंपरेचे वारसदार आहोत, जे असल्या दडपशाहीसमोर झुकत नाही. जोपर्यंत मोदी सरकार हे काळे कृषी कायदे मागे घेणार नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असे खासदार धानोरकर म्हणाले. 

हेही वाचा - मृत्यू जवळ येताना दिसताच 'त्यांनी' घेतला महत्वाचा निर्णय; प्रेरणादायी काम...

मोदी सरकारकडून प्रत्येक ठिकाणी रोखलं जात आहे. इतर राज्यांत जाऊ दिलं जात नाही. काँग्रेस खासदारांना कार्यालयांतून बाहेर पडू दिलं जात नाही. हाथरसला गेलो की अटक केली जाते. मोदींनी हे समजून घ्यावं की प्रत्येक गोष्टीला मर्यादा असतात. जे कोणी नरेंद्र मोदींच्या विरोधात उभे राहतात, त्यांच्याबद्दल अपप्रचार केला जातो. शेतकऱ्यांनी विरोध केला तर त्यांना देशद्रोही ठरवण्यात येतं. मजुरांनी विरोध केला तर त्यांनाही देशद्रोही ठरवण्यात येतं. संपूर्ण देश पाहतोय की शेतकरी दुःखात, त्रासात आहे. मोदींना त्यांचे ऐकावेच लागेल. शेतकऱ्‍यांसमोर, मजुरांसमोर मोठ्यात मोठ्या ताकदीचा टिकावे लागत नाही. जर का हे कायदे मागे घेतले नाही तर संपूर्ण देशाचं नुकसान होईल, असेही खासदार धानोरकर म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mp balu dhanorkar criticized pm modi in chandrapur