Amravati : पोलीस आयुक्तांवर कारवाई करा; नवनीत राणांचे अमित शहांना पत्र

mp navneet rana demands removal of amravati commissioner aarti singh
mp navneet rana demands removal of amravati commissioner aarti singh sakal

अमरावती : मुंबईत मातोश्रीबाहेर हनुमान चालिसाचे पठण केल्याने प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीच्या आयुक्त आरती सिंह यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. उदयपूरच्या धर्तीवर अमरावतीत उमेश कोल्हे यांची हत्या आयुक्तांच्या अपयशामुळे झाल्याचे पत्र त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांना लिहिले आहे.

अमरावतील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे (Umesh Kolhe) यांची 21 जून रोजी हत्या करण्यात आली होती. पोलिसांचे म्हणणे आहे की केमिस्ट उमेश यांनी नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडिया पोस्टवर टिप्पणी केली होती. यातूनच उमेशचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान हत्या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांचं समर्थन केल्यानं कोल्हे यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप भाजपनं केला होता. त्यानंतर आता हा तपास एनआयएकडे (NIA) वर्ग करण्यात आला असून, या तपासातून काय बाहेर येतं हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

mp navneet rana demands removal of amravati commissioner aarti singh
नुपूर शर्मांचे समर्थन केल्यानचं अमरावतीत कोल्हेंची हत्या; भाजपचा आरोप

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर देशभरात मोठ्या प्रमाणात निदर्शनं करण्यात आली होती. यावेळी अनेक राज्यात निदर्शनांना हिंसक वळनदेखील लागले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शर्मा यांचे समर्थन केल्याप्रकरणी उदपूर (Udaypur) येथील टेलर व्यावयायिकाची त्याच्या दुकानात घुसून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर 21 जून रोजी अमरावती (Amravati) येथील मेडिकल व्यावयायिक असणाऱ्या उमेश कोल्हे यांची 21 जूनच्या रात्री हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर भाजपने ही हत्या शर्मा यांचे समर्थन केल्यामुळेच झाल्याचा आरोप केला होता.

mp navneet rana demands removal of amravati commissioner aarti singh
उदयपूर हत्याकांड अन् २६/११ चं कनेक्शन काय? वाचा काय आहे प्रकरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com