नवनीत राणांची 'ती' पेरणी सापडली वादात; मागविला खुलासा

Navneet Rana
Navneet Rana

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी शेतात जाऊन केलेली पेरणी वादात सापडली असून, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने मनाई केलेल्या जमिनीवर त्यांनी पेरणी केल्याने त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे.  

नवनीत राणा यांनी सोमवारी पेरणी केल्याप्रकरणी वनविभागाने धारणीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागवले आहे. मेळघाट दौऱ्यादरम्यान सेमाडोह येथील सन्नू रामलाल चव्हाण यांच्या जमिनीवर पेरणी केली. त्या स्वत: अन्य शेतमजुरांसह जमिनीत बियाणे टाकत असल्याचे चित्रीकरण सार्वत्रिक झाले. पण, या जमिनीवर पेरा करण्यास व्याघ्र प्रकल्पाकडून मनाई करण्यात आली होती. वनजमिनीवरील हे अतिक्रमण असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे.

सेमाडोह वनपरिक्षेत्रातील वनखंड क्रमांक १७६ मध्ये ही शेती करण्यात येत असल्याने आता यासंदर्भात उपविभागीय अधिकऱ्यांकडून खुलासा मागवण्यात आला आहे. नवनीत राणा यांनी सन्नू रामलाल चव्हाण यांच्या शेतात केलेली पेरणी त्यामुळेच वादात सापडली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com