एम.फिल.साठीसुद्धा आता पेट-1 अनिवार्य

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

नागपूर : पीएचडीपाठोपाठ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने एम.फिल.साठीसुद्धा पेट-1 परीक्षा अनिवार्य केली आहे. एम. फिल. झालेल्या विद्यार्थ्यांना पीएच.डी. करायची असल्यास त्याला इतर प्रवेश परीक्षा देण्याची गरज भासणार नाही, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.

एम. फिल. नोंदणीसाठीदेखील विद्यापीठांनी आपापल्या पातळीवर प्रवेश परीक्षा घ्यावी, असे विद्यापीठ अनुदान आयोगाने अधिसूचनेतून कळविले आहे. नागपूर विद्यापीठात पीएच.डी. नोंदणीसाठी पेट घेण्यात येते. मात्र. एम.फिल.साठी कुठलीही वेगळी प्रवेश परीक्षा नव्हती. अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार नवीन नियमावली लागू करण्यात आली. "पेट'सोबतच ही परीक्षा घेण्यात येणार आहे. पीएचडीसाठी पेट-1व पेट-2 परीक्षा घेण्यात येते. एम.फिल.साठी मात्र केवळ एकच पेट-1 परीक्षा घेतील जाणार आहे. संशोधनाचा स्तर वाढावा, यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने अगोदरच पावले उचलली होती. नागपूर विद्यापीठाला "नॅक'चा अ दर्जा मिळाल्यामुळे पीएचडीच्या स्तरातदेखील वाढ करण्याची प्रशासनाला आवश्‍यकता वाटत होती. त्यामुळे यासंदर्भात नागपूर विद्यापीठाने मागील वर्षी नवीन नियमावली जारी केली होती. नोंदणीसाठी पेटच्या दोन परीक्षा उत्तीर्ण करण्याची अटदेखील लागू करण्यात आली. मात्र, एम. फिल. करणाऱ्या विद्यार्थ्यांना पेट-1 एकच परीक्षा द्यावी लागणार आहे. यानंतर तो विद्यार्थी एम. फिल. झाल्यावर त्याला अन्य कुठलीही प्रवेश परीक्षा न देता पीएचडीला प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे एम. फिल. विद्यार्थ्यांच्या पुढील संशोधनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Web Title: For the M.Phil now the Pet-1 compulsory