esakal | तब्बल पाचशे अंगणवाड्यांवर कोसळणार महावितरणची वीज? बिलाचे तब्बल 47 लाख थकीत

बोलून बातमी शोधा

abc }

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मार्च 2020 मध्ये लॉकडाउन करण्यात आले होते. याकाळात घरगुती, औद्योगिक, कृषी ग्राहकांचे मीटररिडींग तसेच वीजबिल वसुली बंद होती.

vidarbha
तब्बल पाचशे अंगणवाड्यांवर कोसळणार महावितरणची वीज? बिलाचे तब्बल 47 लाख थकीत
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : जिल्ह्यातील तब्बल 515 अंगणवाड्यांकडे 46 लाख 97 हजार 918 रुपयांचे वीजबिल थकीत आहे. वीजबिलाचा भरणा करावा, असे पत्र महावितरण कंपनीकडून संबंधित विभागाला पाठविण्यात आले आहे. वीजबिलाचा भरणा न केल्यास वीजपुरवठा खंडित केल्या जाण्याची शक्‍यता आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मार्च 2020 मध्ये लॉकडाउन करण्यात आले होते. याकाळात घरगुती, औद्योगिक, कृषी ग्राहकांचे मीटररिडींग तसेच वीजबिल वसुली बंद होती. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे वीजबिल सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडे थकीत होते. वारंवार आवाहन केल्यानंतरदेखील ग्राहकांनी वीजबिलाचा भरणा केला नाही. परिणामी, महावितरणने फेब्रुवारी महिन्यापासून वसुली मोहीम राबविण्यास सुरुवात केली. 

हेही वाचा - ...अन् मास्कसाठी त्याने फाडले शर्ट; हतोडीने दात...

मोहिमेनंतर महावितरणाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बहुतांश ग्राहकांची समजूत काढली. यानंतर जवळपास नऊ हजारांवर ग्राहकांनी वीजबिलाचा भरणा केला. यानंतरही वीजबिल वसुली मोहीम सुरू होती. मात्र, वसुली मोहिमेला विरोध झाल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार वसुली थांबवीत असल्याची घोषणा विधिमंडळात केली. तेव्हापासून मोहिम थांबविण्यात आली आहे. 

या प्रकारामुळे महावितरण कंपनीसमोर प्रचंड अडचणी वाढल्या आहेत. तोट्यात आलेल्या महावितरणने आता शासकीय कार्यालयाकडील वीजबिलाचा भरणा करावा, याकरिता पत्रव्यवहार सुरू केला आहे. या निर्णयानुसार जिल्हा परिषद प्रशासनाला अंगणवाड्यांचे थकीत वीजबिल भरावे, असे पत्र पाठविले आहे. 

हेही वाचा - कोरोना महामारीतही महिला अत्याचारांना ‘नो ब्रेक’; २६...

जिल्ह्यातील 515 अंगणवाड्यांकडे 46 लाख 97 हजार 918 रुपयांचे वीजबिल थकीत आहे. याबाबत त्वरित पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा येत्या काळात अंगणवाड्यांचा वीजपुरवठा खंडित केला जाण्याची शक्‍यता आहे.

संपादन - अथर्व महांकाळ