राज्यात महावितरणचे 100 चार्जिंग स्टेशन

राज्यात महावितरणचे 100 चार्जिंग स्टेशन
Summary

आता राज्य शासनाने महावितरणला नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केले आहे.

यवतमाळ: वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या किमतीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल व डिझेल वाहनांमुळे प्रदूषणाचा प्रश्‍न उपस्थित होत आहे. त्यामुळे शासन इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे. अनेक कपंन्यांची इलेक्ट्रिकल वाहने बाजारात येत आहेत. त्यांना चार्जिंग स्टेशनची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळेच आता राज्य शासनाने महावितरणला नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केले आहे.

राज्यात महावितरणचे 100 चार्जिंग स्टेशन
यवतमाळ जिल्ह्यातील जलसुरक्षा धोक्यात, अहवालातून समोर आली माहिती

महावितरण पहिल्या टप्प्यात शंभर चार्जिंग स्टेशन तयार करणार आहे. पहिल्या टप्प्यात ठाणे, वाशी, पुणे, औरंगाबाद, नाशिक, सोलापूर या शहरांसह विदर्भातील नागपूर व अमरावती या दोन शहरांचा समावेश आहे. काही काळापासून इलेक्ट्रिकल वाहनांची चाचपणी सुरू आहे. काही शहरांत विद्युत वाहने सुरू करण्यात आली आहेत. केंद्र शासनाकडून अशा वाहनांसाठी प्रोत्साहन मिळत आहे. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरामुळे आता नागरिकही इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. काही शहरांत बस तसेच ऑटो विद्युतवर आले आहेत. काही वर्षांत दुचाकी, तीनचाकी तसेच चारचाकी इलेक्ट्रिकल वाहने बाजारात येत आहेत. या वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनची आवश्यकता भासणार आहे.

राज्यात महावितरणचे 100 चार्जिंग स्टेशन
यवतमाळ : कळंबच्या कन्येला विठ्ठल पूजेत सहभागी होण्याचा मान

राज्य शासनाने चार्जिंग स्टेशनची नोडल एजन्सी म्हणून महावितरणला जबाबदारी दिली आहे. या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याचे आदेश महावितरणला दिले आहे. त्यानुसार महावितरणकडून जागेची शोधमोहीम सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात राज्यात तब्बल शंभर चार्जिंग स्टेशन तयार करण्याचे नियोजन महावितरणकडून केले जात आहे. राज्यातील मोठ्या शहरांत हे स्टेशन असणार आहे. चार्जिंग स्टेशन झाल्यावर नागरिकांना पेट्रोल पंपाप्रमाणे या ठिकाणी वाहन चार्जिंग करून मिळणार आहे. यासाठी दर निश्‍चित केले जाणार आहेत.

राज्यात महावितरणचे 100 चार्जिंग स्टेशन
यवतमाळ : अहवालासाठी दोघांच्या आत्महत्येच्या प्रयत्नाने खळबळ

विदर्भातील दोन शहरे

महावितरणकडून चार्जिंग स्टेशन तयार करण्यासाठी जागेची शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. नागपूर तसेच अमरावती या दोन शहरात चार्जिंग स्टेशन केले जाणार आहे. राज्यात शंभर स्टेशन असणार आहे. मात्र, कोणत्या शहरात किती राहतील, यावर काम सुरू आहे. त्यामुळे लवकरच अनेक शहरांत पेट्रोल पंपाप्रमाणे महावितरणचे चार्जिंग स्टेशन दिसणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com