

An MSRTC bus caught fire in Khandala Ghat, but the driver and conductor safely evacuated around 50 passengers before the flames spread.
Sakal
पुसद : वाशिम-पुसद मार्गावरील खंडाळा घाटात मंगळवारी ता. १४ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास धावत्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसला अचानक भीषण आग लागल्याने काही काळ एकच खळबळ उडाली. चालक आणि वाहक यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील सुमारे ५० प्रवाशांना वेळेत सुरक्षित बाहेर काढण्यात यश आल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र काही क्षणांतच बसने रौद्ररूप धारण करत संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.