रेल्वेगाडीच्या धडकेत बिबट्या ठार

File photo
File photo

मूल (जि. चंद्रपूर) : रेल्वेगाडीच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना तालुक्‍यातील राजोली वनक्षेत्रांतर्गत चितेगाव बिटामध्ये सोमवारी (ता. 7) रात्री घडली. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. मृत बिबट मादी जातीचे असून वय अंदाजे दीड ते दोन वर्षाचे आहे.
राजोली वनक्षेत्रातून बल्लारपूर-गोंदिया रेल्वे मार्ग गेलेला आहे. या क्षेत्रात वन्यजीवांचा मोठ्या प्रमाणात संचार आहे. या आधीही रेल्वेगाडीच्या धडकेत चिचपल्ली, केळझर या वनक्षेत्रात वाघ, अस्वल यांचा बछड्यासह आणि इतर वन्यजीवांचा मृत्यू झाला आहे. वनव्याप्त क्षेत्र असल्याने वन्यप्राणी सावज आणि पाण्याच्या शोधात भटकत असतात. कक्ष क्रमांक 136 मधून गेलेला रेल्वे रूळ ओलांडत असताना चितेगावजवळ रेल्वेगाडीने बिबट्याला धडक दिली. त्यात बिबट जागीच ठार झाला. मंगळवारी सकाळी गावकऱ्यांमुळे ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती वनविभागास देण्यात आली. सावलीचे वनपरिक्षेत्राधिकारी झाडे, क्षेत्रसहायक गुज्जनवार, वन्यजीव अभ्यासक उमेश सिंह झिरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृत बिबट्यावर शवविच्छेदनानंतर राजोली येथील वनवसाहतीच्या आवारात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com