मुंबई- नागपूर वन वे विशेष रेल्वेगाडी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

अमरावती : दीपावलीनिमित्त प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता मध्यरेल्वेने खास प्रवाशांच्या सुविधेसाठी मुंबई-नागपूर वन वे सुपरफास्ट विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ही गाडी प्रस्थान करून नागपूरला पोहोचेल. 13 ऑक्‍टोबरला ही विशेष गाडी मुंबईहून नागपूरसाठी प्रस्थान करेल. गाडी क्रमांक 02031 ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसनहून मध्यरात्री 12.20 वाजता सुटेल. त्याच दिवशी दुपारी तीन वाजता नागपूर स्थानकावर पोहोचेल.

अमरावती : दीपावलीनिमित्त प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता मध्यरेल्वेने खास प्रवाशांच्या सुविधेसाठी मुंबई-नागपूर वन वे सुपरफास्ट विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ही गाडी प्रस्थान करून नागपूरला पोहोचेल. 13 ऑक्‍टोबरला ही विशेष गाडी मुंबईहून नागपूरसाठी प्रस्थान करेल. गाडी क्रमांक 02031 ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसनहून मध्यरात्री 12.20 वाजता सुटेल. त्याच दिवशी दुपारी तीन वाजता नागपूर स्थानकावर पोहोचेल. मुंबई ते नागपूर मार्गावरील दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगावरेल्वे तथा वर्धा स्थानकावर ही गाडी थांबेल. शयनयान श्रेणीचे 14 डबे, सामान्य द्वितीय श्रेणीचे 6 डबे या गाडीला राहतील. या गाडीसाठी बुकिंग सेवा पीआरएस केंद्रावर तथा आयआरसीटीसी संकेतस्थळावर उपलब्ध राहील. 11 ऑक्‍टोबरपासून आरक्षण करता येईल. सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे अनारक्षित स्वरूपात चालविण्यात येईल. याची बुकिंग युटीएस प्रणालीद्वारे होईल. प्रवाशांनी सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्यरेल्वेच्या भुसावळ विभागाने केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai-Nagpur One-Way Special Train