नागपूरच्या अंबाझरी तलावात बुडाला मुंबईचा युवक

आनंद द्विवेदी
आनंद द्विवेदी

नागपूर : तलावात पोहत असताना अतिआत्मविश्‍वास एका युवकाला नडला. खोल पाण्यात गेल्याने युवकाचा गटांगळ्या खाऊन बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी बारा वाजता अंबाझरी तलावात घडली. आनंद द्विवेदी (माटुंगा, मुंबई) असे मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद द्विवेदी हे उच्चशिक्षित असून नागपुरातील आयटी पार्कमधील एका नामांकित कंपनीला नोकरीवर आहेत. शनिवारी कंपनीला सुटी असल्यामुळे ते 6 मित्रांसह पोहायला अंबाझरी तलावावर गेले. मित्रांसह पाण्यात पोहायला उतरले. आनंद यांना पोहणे येत नसल्यामुळे सुरुवातीला त्यांनी काठावर पोहणे पसंत केले; तर हर्षल गेडाम (रा. मुंबई) हा खोल पाण्यात पोहत होता. त्यामुळे आनंदला उत्साह वाढला. त्याने काही वेळातच खोल पाण्यात पोहणार असल्याचे मित्रांना सांगितले. काहींनी विरोध केला; तरीही आनंद खोल पाण्यात गेला. तेथे पाण्याचा अंदाज न आल्याने गटांगळ्या खाऊ लागला. मात्र, कुणालाही पोहणे येत नसल्यामुळे आनंद यांना वाचविण्याची हिंमत केली नाही. त्यामुळे काही वेळातच आनंद यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मित्रांनी आरडाओरड केली. पोलिस आणि अग्निशमन दलाला बोलविण्यात आले. उशिरा आनंद यांचा मृतदेह तलावाबाहेर काढण्यात आला.
तलावावर 40 जण
रविवारी सकाळपासूनच अंबाझरी तलावावर चांगलीच गर्दी आहे. आनंद हे पोहायला पाण्यात उतरले त्यावेळी 10 ते 12 जण पाण्यात पोहत होते; तर जवळपास 40 जण काठावरून मौजमजा पाहत होते. परंतु, आनंद बुडत असताना एकाही युवकाने त्याला वाचविण्याची हिंमत दाखवली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com