अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने; मुंडन आंदाेलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर काही समाजकंटकांनी संविधानाच्या उद्देश्य पत्रिकेची प्रत जाळून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविराेधी घाेषणा दिल्या. त्यामुळे आंबेडकर अनुयायांच्या भावना दुखावल्या आहेत.

अकाेला - दिल्ली येथील घटनेच्या निषेधार्थ भावना दुखावलेल्या आंबेडकर अनुयायांनी साेमवारी (ता. 13) जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर निदर्शने करून मुंडन आंदाेलन केले.

दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर काही समाजकंटकांनी संविधानाच्या उद्देश्य पत्रिकेची प्रत जाळून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविराेधी घाेषणा दिल्या. त्यामुळे आंबेडकर अनुयायांच्या भावना दुखावल्या आहेत. सदर घटनेचा निषेध करण्यासाठी व संबंधित समाजकंटकांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणासाठी रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडिया (अ) च्या वतीने साेमवारी (ता. 13) जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आले. यावेळी संविधानाच्या प्रती जाळणाऱ्यांच्या विराेधात घाेषणासुद्धा देण्यात आल्या. आंदाेलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मुंडन आंदाेलन करून दाेषींवर कारवाई करण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांना घटनेचा निषेध करण्यासंबंधी निवेदन सुद्धा देण्यात आले. यावेळी रिपाइं (अ) गटाचे महानगर जिल्हाध्यक्ष गजानन कांबळे, रिपब्लीकन बहुजन विद्यार्थी परिषद जिल्हाध्यक्ष राेहित वानखडे, विनाेद गाेपनारायण, युवराज भागवत, राजकुमार सिरसाट, अनिल पहुरकर, मनाेज गमे, संजय भगत, आकाश हिवराळे, विजय भगत, अतुल शंभरकर, अनिरूद्ध वानखडे, आकाश साेनाेने व इतर कार्यकर्ता उपस्थित हाेते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Mundan Agitation in front of Akola District Collector office