esakal | 80 वर्षाच्या शेतकऱ्यांने लॉकडाउनचा घेतला असा फायदा; तरुणांनाही लाज वाटेल
sakal

बोलून बातमी शोधा

AKO2

कोरोना महामारीमुळे प्रत्येकजण घरात लॉकडाउन आहेत. त्यामुळे अनेकांना कंटाळा येत असला तरी येथील एका 80 वर्षीय शेतकऱ्यांना चक्क गांडूळ खताची निर्मिती करून वेळेचा सदउपयोग घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे 80 वर्षीय या शेतकऱ्यांचे काम तरुणांनाही लाजवेल असे आहे.

80 वर्षाच्या शेतकऱ्यांने लॉकडाउनचा घेतला असा फायदा; तरुणांनाही लाज वाटेल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंडगाव (जि. अकोला) : कोरोना महामारीमुळे प्रत्येकजण घरात लॉकडाउन आहेत. त्यामुळे अनेकांना कंटाळा येत असला तरी येथील एका 80 वर्षीय शेतकऱ्यांना चक्क गांडूळ खताची निर्मिती करून वेळेचा सदउपयोग घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे 80 वर्षीय या शेतकऱ्यांचे काम तरुणांनाही लाजवेल असे आहे.

क्लिक करा- काय म्हणता, चक्क सावली होणार गायब

आंब्याच्या बागेत करत आहेत खताचा वापर
जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास प्रामाणिकपणाच्या जोरावर येथील एका शेतकऱ्याने दोन एकर शेतात आंब्याची झाडे लावून त्यातून भरघोच्च उत्पादन घेत आहे. गेल्या 15 वर्षांपासून आंब्याच्या विविध जातीचे उत्पादन घेण्याचा त्यांचा क्रम सुरू असतानाच त्यांनी आता गांडूळ खताची निर्मिती केली आहे. येथील 80 वर्षीय शेतकरी रामकृष्ण गणगणे असे त्यांचे नाव आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउनच्या काळात गांडूळ खताची निर्मिती करून आपल्या फावल्या वेळेचा सदुपयोग त्यांनी घेतला आहे. इतरांनीही त्याचा चांगला उपयोग घ्या असा सल्ला त्यांनी दिला आहे. येथील माजी सरपंच गुणवंत गणगणे यांचे वडील रामकृष्ण गणगणे यांनी खारपाणपट्ट्यातील लामकानी शिवारात आंब्याची बाग तयार केली आहे. रामकृष्ण गणगणे हे आपल्या बागायती व कोरडवाहू शेतात नेहमीच पारंपरिक पद्धतीने वेगवेगळी पिके घेऊन त्यात मोठे उत्पादन घेतात. त्यात गांडूळ खताचाही ते वापर करत असल्याचे पुढे आले आहे.

loading image