महापालिकेला आयुक्त भेटले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

नागपूर - सुमारे पंधरा दिवसांपासून रिक्त असलेल्या महापालिकेच्या आयुक्तपदी वीरेंद्रसिंग यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या बदलीचे आदेश निघाले आहेत. महापालिकेला आयुक्त नसल्याने जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली होती. दोन आठवड्यांपूर्वी महापालिका आयुक्त अश्‍विन मुद्‌गल यांची जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली होती. त्याच वेळी वीरेंद्रसिंग येणार म्हणून चर्चा होती; मात्र आदेश निघाला नव्हता. दुसरीकडे, सुधार प्रन्यासचे सभापती दीपक म्हैसेकर यांचीही बदली करण्यात आली; मात्र त्यांचीही जागा रिक्त ठेवण्यात आली होती.

नागपूर - सुमारे पंधरा दिवसांपासून रिक्त असलेल्या महापालिकेच्या आयुक्तपदी वीरेंद्रसिंग यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या बदलीचे आदेश निघाले आहेत. महापालिकेला आयुक्त नसल्याने जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली होती. दोन आठवड्यांपूर्वी महापालिका आयुक्त अश्‍विन मुद्‌गल यांची जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली होती. त्याच वेळी वीरेंद्रसिंग येणार म्हणून चर्चा होती; मात्र आदेश निघाला नव्हता. दुसरीकडे, सुधार प्रन्यासचे सभापती दीपक म्हैसेकर यांचीही बदली करण्यात आली; मात्र त्यांचीही जागा रिक्त ठेवण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांच्या शहरात दोन बड्या अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने चर्चेचा विषय झाला होता. विशेष म्हणजे, या दरम्यान मुख्यमंत्र्यांचे समाधान शिबिरसुद्धा झाले. आज आणखी १७ अधिकाऱ्यांच्या बदल्या करून राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात फेरफार केले. यात वीरेंद्र सिंग यांना नागपूरला पाठविण्यात आले आहे. आजच जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांनी सुधार प्रन्यासची प्रभारी जबाबदारी स्वीकारून दीपक म्हैसेकर यांना मोकळे करण्यात आले आहे.

Web Title: municipal commissioner virendra singh