मनपा अधिकाऱ्यांचा ‘भेजाफ्राय’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

नागपूर - प्लॅस्टिकबंदीतून किरकोळ व्यापाऱ्यांना सूट देण्याचा निर्णय पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी जाहीर केला असला तरी याबाबत कुठलीही अधिसूचना न मिळाल्याने महापालिका अधिकाऱ्यांत संभ्रम वाढला आहे. अधिसूचना न मिळाल्याने महापालिका अधिकाऱ्यांनी आज किरकोळ व्यापाऱ्यांवरही कारवाई करीत एकूण ९ क्विंटल प्लॅस्टिक जप्त केले. 

शनिवारपासून प्लॅस्टिकबंदी लागू झाली. महापालिकेने कारवाईला सुरुवात केली. त्यातच  मंगळवारी काही व्यापारी संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या व्यापारी संघटनांनी तीन महिन्यांची मुदतवाढ मागितल्याने प्लॅस्टिकबंदी पुढे ढकलण्यात आल्याच्या अफवेला पेव फुटले.

महापालिकेच्या कारवाईदरम्यान अनेकांनी तीन महिने पुढे ढकलल्याचे  सांगत कारवाईपासून वाचण्याचा प्रयत्न केला. काल, बुधवारी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी पाव किलो वस्तुसाठी किरकोळ व्यापाऱ्यांना प्लॅस्टिकबंदीतून सशर्त सूट देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्या निर्णयामुळे शहरातील किरकोळ व्यापाऱ्यांत आनंदाचे वातावरण होते. मात्र, महापालिकेचे अधिकारी पुन्हा गोंधळात पडले. याबाबत अधिसूचनेची त्यांना प्रतीक्षा होती. त्यांनी कुठलीही अधिसूचना न मिळाल्याने आज दिवसभर महापालिकेच्या दहाही झोनच्या पथकांनी प्लॅस्टिक विक्रेते दुकानदार, किरणा दुकानदार आणि वापरकर्त्यांवर कारवाई केली.

जप्त प्लॅस्टिक ८९७.९ किलो
दंड १ लाख रुपये
नोटीस १६ 

दुकानदारांचा अधिकाऱ्यांवर संताप
प्लॅस्टिकबंदीबाबत वारंवार वेगवेगळे निर्णय जाहीर होत असल्याने महापालिका अधिकाऱ्यांत संभ्रम निर्माण झाला आहे. मंत्री घोषणा करतात, परंतु अधिसूचना काढली जात नाही. कारवाई करतेवेळी दुकानदार अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करतात. त्यामुळे डोकेदुखी वाढल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. आज महापालिकेने दहाही झोनमध्ये कारवाई करीत ८९७.९ किलो प्लॅस्टिक जप्त केले. यात मंगळवारी झोनमध्ये सर्वाधिक ७६० किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. 

Web Title: Municipal officer plastic ban