मेहुण्याने केला जावयाचा खून 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

अमरावती - कौटुंबिक कलहातून मेहुण्याने साथीदाराच्या मदतीने जावयाचा खून केल्याची घटना गुरुवारी (ता.12) रात्री साडेसातच्या सुमारास घडली. साबीरशा सिकंदरशा (रा. लालखडी) असे मृत जावयाचे नाव आहे. खुनानंतर लालखडी परिसरात तणाव निर्माण झाला होता. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साबीरशा याचे कौटुंबिक कारणावरून काही दिवसांपासून पत्नीसोबत मतभेद सुरू होते. त्यावरून कुटुंबात भांडणे सुरूच होती. गुरुवारी (ता. 12) साबीरशा घरात झोपला असताना त्याचा साळा अलीम मोहंमद खॉ व खाजा (दोघेही रा. हैदरपुरा) दोघेही लालखडी परिसरात जावयाच्या घरी आले. त्याला धमकी दिली. घरात झोपेत असलेल्या साबीरशा याच्या पाठीवर चाकूने सपासप वार करून दोघांनी पळ काढला. घटनेनंतर कुटुंबीयांनी जखमीला उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीअंती डॉक्‍टरांनी साबीरशाला मृत घोषित केले. घटनेनंतर गुन्हेशाखा व नागपुरीगेट पोलिस पथक लालखडी परिसरात दाखल झाले. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

धामणगाव काटपुरात प्राणघातक हल्ला 
जिल्ह्यातील शिरखेड ठाण्याच्या हद्दीत धामणगाव (काटपूर) येथील दिलीप देवीदास निमकर्डे (वय 40) यांच्यावर दोघांनी प्राणघातक हल्ला केला. डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्याने जखमीला इर्विन रुग्णालयात दाखल केले. तेथून खासगी रुग्णालयात हलविले. 

Web Title: murder in amravati