अकोला : कौटुंबिक कलहातून तिघांचा खून

अनिल दंदी
गुरुवार, 17 मे 2018

अनेक दिवसांपासून आरोपीची पत्नी सासरी राहत नसल्याच्या कारणावरून कुटूंबात वाद होता. हाच वाद टोकाला जावून त्याचे रुपांतर खुनात झाले आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोयत्याने तिघांवर वार करण्यात आले. यामध्ये एकाचा घटनास्थळी मृत्यू झाला तर अन्य दोन जण उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मेहबूब खान, शबाना मेहबूब खान व फिरोज मेहबूब खान अशी मृतकांची नावे आहेत. आरोपीने सासू, सासरा व मेव्हण्याचा खून केला आहे.

अकोला : कौटूंबिक वादातून तिघांचा खून करण्यात आल्याची घटना बाळापूर शहरात बुधवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली असल्याची माहीती आहे.

अनेक दिवसांपासून आरोपीची पत्नी सासरी राहत नसल्याच्या कारणावरून कुटूंबात वाद होता. हाच वाद टोकाला जावून त्याचे रुपांतर खुनात झाले आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोयत्याने तिघांवर वार करण्यात आले. यामध्ये एकाचा घटनास्थळी मृत्यू झाला तर अन्य दोन जण उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मेहबूब खान, शबाना मेहबूब खान व फिरोज मेहबूब खान अशी मृतकांची नावे आहेत. आरोपीने सासू, सासरा व मेव्हण्याचा खून केला आहे.

शहरातील आबादनगरात हि घटना घडली असून घटनेची माहीती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कलासागर अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर, उपविभागीय पोलिस अधिकारी सोहेल शेख, बाळापूर प्रभारी  ठाणेदार अनिल ठाकरे व पोलिसांचा प्रचंड ताफा बाळापूरात दाखल झाला. यामध्ये सहभागी असलेला एक आरोपी फरार होऊन बार्शिटाकळी येथे लपून बसल्याची माहीती ठाणेदार तिरुपति राणे यांना मिळताच त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह छापामारुन कारवाई करत आरोपीला पकडून बाळापूर पोलिसांच्या ताब्यात दिले असल्याची माहीती सुत्रांनी दिली आहे.

आरोपी सै.फिरोज से रज्जाक हा बार्शिटाकळी तालुक्यातील एरंडा-पारंडा येथील रहीवाशी असून तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याची पत्नी त्याच्याकडे राहत नव्हती. तिचे आई-वडील देखील तिला सासरी पाठवत नव्हते. अनेक दिवसांपासून पत्नी माहेरी असल्याने आरोपी बाळापूरात येऊन वाद घालत होता. हाच राग अनावर होत आरोपी जावयाने सासू-सासरा व मेव्हण्याला ठार मारले, अशी माहीती पोलिस सुत्रांनी दिली आहे. मात्र यामागील खरे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे. पोलिस त्या दिशेने तपास करीत आहेत.

Web Title: murder in Balapur Akola