डिजेवर नाचताना धक्‍का लागल्यामुळे युवकाचा खून

crime
crime

नागपूर : लग्नात डीजेवर नाचताना धक्‍का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका युवकावर सहा आरोपींनी तलवार आणि गुप्तीने सपासप वार करून खून केला. तसेच मध्यस्थी करणाऱ्या युवकावरही चाकू हल्ला केला. हा थरार मंगळवारी रात्री अकरा वाजता अजनीतील धोबी घाट चौकात घडला. आशूतोष बाबुलाल वर्मा (वय 25, रा. नवीन बाबुलखेडा, धोबी घाट) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 मे ला आशूतोषच्या मित्राचे रामटेक
येथे लग्न होते. त्या लग्नात आशूतोष हा मित्रांसह गेला होता. तेथे डीजेवर
नाचताना शुभम कठोते याला धक्‍का लागला. या कारणावरून शुभम आणि आशूतोषचा वाद झाला. दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली. शुभमने त्याला नागपुरात "गेम' करण्याची धमकी दिली. मंगळवारी सायंकाळी लग्नानंतर रिसेप्शनच्या कार्यक्रमात आशुतोषची शुभमने भेट घेतली.

जेवण आटोपल्यानंतर आशुतोष घरी गेला. शुभमने आशूतोषला फोन केला. "एक मॅटर सलटाने का हैं'..चौक में आ' असे बोलला. त्यामुळे आशूतोष हा मित्र शुभम शुभम नलीन कांबळे (वय 23, रा. नवीन बाबुलखेडा) याला घेऊन धोबी घाट चौकात गेला. तेथे शुभम आणि मनिष उर्फ मन्या अशोक गवतेल (वय 20, कौशल्यानगर), ललित उर्फ काल्या (वय 20), विनू मेश्राम आणि अन्य दोन युवक उपस्थित होते. आशूतोषच्या गळ्यात हाथ घालून त्याला धोबीघाटाकडे नेले. अंधारात नेल्यानंतर सर्वांनी पाठीमागे लपविलेले धारदार शस्त्रे काढून अचानक आशूतोषवर प्राणघातक हल्ला केला. आशूतोषला रक्‍ताच्या थारोळ्यात लोळवून सर्व आरोपींनी पळ काढला. शुभम कांबळेने लगेच काही मित्रांना फोन करून बोलावले. त्यांनी लगेच आशूतोषला मेडिकलला हलवले. मात्र, उपचारादरम्यान आज पहाटे दोन वाजताच्या सुमारास आशूतोषचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी तुर्तास दोन आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला.

कांबळेने दाखवली हिंमत
आशुतोषवर जवळपास 6 आरोपी तलवारीने हल्ला करीत असताना शुभम कांबळे जीवाच्या भीतीने पळून जाता तेथेच थांबला. आरोपींचे वार चुकविण्यासाठी त्याने आशुतोषची मदत केली. आशूतोषच्या मानेवर झालेला वार शुभमने आपल्या हातावर झेलला. परंतु, मनिषने आशूतोषच्या पोटातून तलवार आरपार केल्यामुळे त्याचा जीव गेला.

जखमी शुभम थेट ठाण्यात शुभम कांबळेच्या हातावर जबर वार होता. मात्र, आरोपी लवकरात लवकर पकडल्या जावे, यासाठी त्याने उपचारासाठी मेडिकलमध्ये जाण्यास नकार देत थेट अजनी पोलिस स्टेशन गाठले. मात्र, सुस्त असलेल्या अजनी पोलिसांनी कागदी घोडे नाचविण्यात बराच वेळ घेतला. त्यामुळे हत्याकांडातील आरोपी शहर सोडून पसार होण्यात यशस्वी झाले.

मामा... मुझे पानी तो पिला!
गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या आशूला मेडिकलमध्ये दाखल केले. त्याने लगेच मामा सतीश शिवनवरे यांना बोलविण्याची विनंती केली. सतीश लगेच
हॉस्पिटलमध्ये पोहचला. मामाला पाहताच त्याने हंबरडा फोडत आरोपींची नावे सांगितली. "मामा..मुझे पाणी तो पिला यार...' असे बोलून बेशुद्ध झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com