प्रियकर अरुण मिश्रावर खुनाचा गुन्हा दाखल

Crime
Crime

नागपूर - पाचपावलीतील पंकज अंभोरे याचा पत्नीने प्रियकराशी संगनमत करून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेने कसून चौकशी करीत पंकजची पत्नी मनीषा व प्रियकर अरुण मिश्रा या दोघांना अटक केली आहे.

पंकज अंभोरे हा खासगी कंपनीत क्‍वॉलिटी सुपरवायझरचे काम करीत होता. त्याने पतीपासून विभक्‍त झालेली मनीषा हिच्यासोबत कुटुंबीयांच्या विरोधाला झुगारून लग्न केले होते. मनीषाने गुजरातमधील दुसऱ्या पतीकडून मिळालेल्या पैशातून वेंकटेश सिटीमध्ये फ्लॅट घेतला होता. मनीषाचे तीन वर्षांपूर्वी अरुण मिश्रा या युवकाशी सूत जुळले होते. अनैतिक संबंध उघडकीस आल्यानंतर पंकजने मनीषा व अरुण यांची समजूत घातली होती. परंतु, अरुणने मनीषाच्या सांगण्यावरून पंकजला संपवण्याची धमकीही दिली होती.

पाच डिसेंबरच्या रात्री पंकजचा कामठी मार्गावर शिल्पा रोलिंग कंपनीसमोर अरुण व मनीषाने दगडाने ठेचून खून करण्याचा प्रयत्न केला. मृत पावल्याचे समजून त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, पंकज कोमात गेल्यानंतर मृत्यू झाला. पाचपावली पोलिसांनी मनीषावर पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता, हे विशेष.

खुनापूर्वी तिघेही एकत्र
खून होण्यापूर्वी पंकज, मनीषा व अरुण हे तिघेही एकत्र होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दगडाने मारल्यामुळेच पंकजचा मृत्यू झाल्याचा अहवाल दिला होता. तसेच अरुण व मनीषाचे कॉल डिटेल्स बघितले असता खुनानंतरही ते सोबत होते. या आधारावर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मिश्राला अटक केली. मनीषा ही कारागृहात असल्याची माहिती पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.

गुन्हे शाखेमुळे मिळाला न्याय
पंकजने स्वतः डोक्‍यात दगड मारून आत्महत्या केल्याचा दावा पाचपावली पोलिसांनी केला होता. पीएसआय इंगळे यांनी पंकजच्या आई-वडिलाला धमक्‍या दिल्याचा आरोप करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखेचे उपायुक्‍त संभाजी कदम यांनी तपास हाती घेतला. तपासाअंती खुनाचा गुन्हा दाखल केला आणि न्‍याय मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com