लाहेरीत जादूटोण्याच्या संशयावरून महिलेचा खून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

भामरागड (जि. गडचिरोली) - जादूटोणा केल्याच्या संशयावरून एका महिलेचा खून केल्याची घटना शनिवारी (ता. २५) सायंकाळी भामरागड तालुक्‍यातील लाहेरी येथे घडली. 

भामरागड (जि. गडचिरोली) - जादूटोणा केल्याच्या संशयावरून एका महिलेचा खून केल्याची घटना शनिवारी (ता. २५) सायंकाळी भामरागड तालुक्‍यातील लाहेरी येथे घडली. 

पाली गुंडरू मडावी (वय ४२) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. लाहेरी पोलिसांनी सरजू बुक्‍लू बोगामी (वय २४) याला अटक केली. पाली  मडावी आपल्या शेतात काम करीत असताना सरजू याने धारदार चाकूने तिचा गळा कापला. यात तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून सरजू आजारी होता. पाली मडावी हिने जादूटोणाकेला, असा त्याचा संशय होता. त्यामुळे संतापाच्या भरात आपण हे कृत्य केल्याची कबुली त्याने पोलिसांपुढे दिली. पोलिस अधिकारी शशिकांत लोंढे तपास करत आहेत.

Web Title: Murder Crime