दगडाने ठेचून मित्राचा खून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

अशी आली घटना उघडकीस  
सोमवारी सकाळी ८ च्या सुमारास लष्करीबाग येथे राहणारा सुबोध निळकंठ नवनागे (२९) हा कार वॉशिंगसाठी घटनास्थळाहून जात होता. त्याला लघुशंका आल्याने तो झोपडीच्या बाजूला गेला असता एक व्यक्‍ती जमिनीवर पडलेली त्याला दिसून आली. सुबोधने जवळ जाऊन पाहिले असता मृताच्या डोक्‍यातून रक्त निघाल्याचे दिसून येत होते. सुबोधने ही माहिती शहर नियंत्रण कक्षाला दिली.

नागपूर - क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादावादीत एका व्यक्‍तीचा दगडाने ठेचून खून केल्याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. दिलीप ऊर्फ टोयक्‍या सदाशिव धनविजय (५५, रा. सोमनाळा, ता. भिवापूर) असे मृताचे नाव असून हर्षल प्रदीप चौधरी (२८, खामला जुनी वस्ती) असे आरोपीचे नाव आहे. 

दिलीप ऊर्फ टोयक्‍या हा मागील अनेक वर्षांपासून खामला परिसरात एकटाच बेवारससारखा राहत होता. कुणाच्या दुकानातील साफसफाई करायचा. काम मिळाले नाही, तर तो प्लॅस्टिक पन्नी, भंगार वेचून आपला उदरनिर्वाह करायचा. तो खामला मार्गावरील विद्याविकास पब्लिक स्कूलच्या विरुद्ध बाजूला झोपडी बांधून राहत होता. खामला जुनी वस्ती येथे राहणाऱ्या आरोपी हर्षल चौधरी याच्याशी त्याची ओळख होती. हर्षल हातमजुरीचे काम करायचा. दोघेही रात्री दिलीपच्या झोपडीजवळ गप्पा मारत बसायचे. नेहमीप्रमाणे रविवारी रात्री दोघेही गप्पा मारत बसले होते. कसल्यातरी कारणावरून त्यांच्यात वाद झाला. या वादावादीत दिलीपने हर्षलला अश्‍लील शिवीगाळ केली. त्यामुळे हर्षल संतापला आणि त्याने बाजूलाच पडलेला दगड उचलून दिलीपच्या डोक्‍यावर आणि तोंडावर मारून त्याला ठेचून काढले. दिलीप मृत होताच हर्षल तेथून पळून गेला. माहिती मिळताच सोनेगाव पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला.

पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तपासात हर्षलचे नाव निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. सोनेगाव पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Murder Crime