हाणामारीत बापाचा मुलाकडून खून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

आईला शिविगाळ झाल्यामुळे आरोपी मुलाने बापाला घराबाहेर आणून मारामारी करीत काँक्रीटच्या रस्त्यावर आपटल्याने नालीची कडा डोक्याला लागून सैयद रज्जाक गंभीर जखमी होऊन बेशुध्द पडला.

मूर्तिजापूर (जि. अकोला) - बाप-लेकांच्या मारामारीत मुलाकडून बापाचा खून झाल्याची दूर्दैवी घटना या तालुक्यातील उमरी अरब येथे घडली. येथील ग्रामीण पोलिस स्टेशनच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उमरी अरब येथील सैयद रज्जाक सैयद याकुब (52) व त्यांचा मुलगा सैयद सलमान सैयद रज्जाक (22) या दोघांमध्ये शुक्रवारी (ता. 6) रात्री वाद झाला. दोघेही मद्याच्या अंमलाखाली होते.

दरम्यान रज्जाकने पत्नी फैमिदाला शिविगाळ केली. आईला शिविगाळ झाल्यामुळे आरोपी मुलाने बापाला घराबाहेर आणून मारामारी करीत काँक्रीटच्या रस्त्यावर आपटल्याने नालीची कडा डोक्याला लागून सैयद रज्जाक गंभीर जखमी होऊन बेशुध्द पडला. दुसऱ्या दिवशी त्याला येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले व लगेच तेथून अकोल्याच्या सर्वोपचार रूग्णालयात हलविण्यात आले. ग्रामीण पोलिसांना अकोल्याहून माहिती मिळाली, मात्र बेशुद्धावस्थेत असल्यामुळे त्याचे बयान घेता आले नाही. उपचारादरम्यान आज त्याचा मृत्यू झाला. पती भोवळ येऊन पडल्याची फिर्याद फैमिदा सैयद रज्जाकने नोंदविली असून आरोपी सैयद सलमान सैयद रज्जाक याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केल्याचे पोलीसांनी सांगितले. आरोपी विरूद्ध भादंवीच्या कलम 302 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार एपीआय नितिन पाटील यांच्या मार्गदर्शनात उप निरिक्षक संदीप मडावी व हेड काँस्टेबल शिंगणे करीता आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Murder of father By Son In Akola

टॅग्स