दोनशे रुपयांसाठी मित्राचा खून 

Murder
Murder

नागपूर - उसने दिलेले दोनशे रुपये परत करण्यावरून झालेल्या वादातून चार मित्रांनी एका युवकाचा गळा चिरून खून केला. या प्रकरणात मुख्य आरोपी अमन गजभिये (वय २५) याला कळमना पोलिसांनी अटक केली. त्याची रवानगी न्यायालयाने पोलिस कोठडीत केली आहे. 

चंदन ऊर्फ कालू राजकुमार शर्मा (२२, रा. गृहलक्ष्मीनगर, पारडी-भांडेवाडी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तो मामाकडे राहून फर्निचरचे काम करीत होता. शुक्रवारपासून आईवडील चंद्रपूरला गेले होते. त्यामुळे त्याने मित्रांना बोलावून पार्टी करण्याचा बेत आखला होता. रविवारी रात्रीच्या सुमारास अमन गजभिये आणि अन्य चार मित्र दारू पिण्यासाठी कालू शर्माच्या घरी आले. त्यांनी दारू ढोसली. त्यानंतर कालूने अमनकडून दोनशे रुपये उसने घेतले होते. अद्यापपर्यंत ते पैसे परत केले नव्हते. त्यावरून दोघांत वाद झाला. त्यानंतर चौघांनी कालूचा गळा चिरून खून केला. उर्वरित आरोपींचा कळमना पोलिस शोध घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com