esakal | मित्र एकमेकांच्या जीवावर उठले; मित्राचा खून केल्यानंतर विहिरीत फेकला मृतदेह
sakal

बोलून बातमी शोधा

The murder of a friend was committed by a friend in Bhandara

कुटुंबीयांनी शोध घेऊन आंधळगाव पोलिसात तक्रार केली. शनिवारी त्याचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळून आला. घटनेच्या रात्री अमोलसोबत असलेला राकेश मतारे हा फोनवर बोलत होता.

मित्र एकमेकांच्या जीवावर उठले; मित्राचा खून केल्यानंतर विहिरीत फेकला मृतदेह

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात आपसी वादातून एकाची हत्या करण्यात आली तर भंडारा जिल्ह्यात मित्रानेच मित्राचा खून केला. यानंतर त्याचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. यामुळे मैत्रीच जीवावर उठल्याची चर्चा रगू लागला आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात प्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांनी अथक प्रयत्नातून उभारलेल्या सोमनाथ प्रकल्पात झालेल्या खुनाच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. ज्या सोमनाथ प्रकल्पात श्रम परिहाराला प्रथम प्राधान्य दिले जाते. त्याच प्रकल्पातील कामगारांची अपापसातील भांडणे आता यानिमित्ताने चव्हाट्यावर येत आहे. सोमनाथ प्रकल्पातील चौकीदार असलेला कुष्ठरोगी नारायण नाकोडे याची बुधवारच्यादरम्यान धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली.

जाणून घ्या - स्वयंपाक करताना महिलेला अचानक आली दुर्गंधी अन् क्षणात उध्वस्त झाला सुखी संसार; परिसरात हळहळ

त्याच्या घराच्या मागील भागात असलेल्या बंधाऱ्यात मृतदेह आढळून आला. शरीरावर, पोटावर धारदार शस्त्राने भोसकल्याच्या जखमा आढळून आल्या. त्या दिशेने तपास करून पोलिसांनी प्रकल्पातील प्रवीण आगडे याला अटक केली आहे. आरोपीचे आई-वडीलही याच प्रकल्पात काम करतात. आरोपी प्रवीण आगडे हा मिळेल ते काम प्रकल्पात करीत होता. चौकीदार नारायण निकोडे आणि प्रवीण अगडे यांच्यात भांडणे होत होती. तोच राग मनात धरून होता. त्यातून त्याने हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्‍यातील हिवरा येथे मंगळवारपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह विहिरीत मिळाला असून, आपसातील भांडणात त्याचा खून करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. मृताचे नाव अमोल पंजाब चवळे (वय २५) आहे. हिवरा येथील अमोल चवळे मंगळवारी रात्री राकेश मतारे याच्यासोबत गावाच्या बसस्थानकाजवळ होता. मात्र, त्यानंतर त्याचा फोन बंद झाला व तो बेपत्ता झाला.

कुटुंबीयांनी शोध घेऊन आंधळगाव पोलिसात तक्रार केली. शनिवारी त्याचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळून आला. घटनेच्या रात्री अमोलसोबत असलेला राकेश मतारे हा फोनवर बोलत होता. तो आपल्या कुटुंबातील महिलेसोबत बोलत असल्याचा संशय आल्याने दोघांचे भांडण झाले.

नक्की वाचा - दोघांनीही बघितले सुखी संसाराचे स्वप्न, पण एक व्यसन लागलंय अन् सर्वच संपलं

यात आरोपीने रुमालाने अमोलचा गळा दाबून खून केला. नंतर त्याचे हातपाय बांधले व जॅकेटमध्ये दगड ठेवून मृतदेह शेतातील विहिरीत फेकून दिला. आंधळगाव पोलिसांनी तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.