नरखेडमध्ये मायलेकाचा ठेचून खून

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

जलालखेडा/नरखेड : चारवर्षीय चिमुकल्यासह त्याच्या आईचा बत्त्याने ठेचून खून केल्याची घटना नरखेड येथे शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. प्रियांका दिनेश शाहू (वय 25) व अंशूल (वय 4) अशी मृताची नावे आहेत. गणपती असूनही शांतता असल्याने शेजारच्यांनी पाहणी केल्यावर ही घटना समोर आली.

जलालखेडा/नरखेड : चारवर्षीय चिमुकल्यासह त्याच्या आईचा बत्त्याने ठेचून खून केल्याची घटना नरखेड येथे शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. प्रियांका दिनेश शाहू (वय 25) व अंशूल (वय 4) अशी मृताची नावे आहेत. गणपती असूनही शांतता असल्याने शेजारच्यांनी पाहणी केल्यावर ही घटना समोर आली.
मिळालेल्या माहितीनुसार, नरखेड येथील स्वामी विवेकानंद चौकाजवळ भांडेखारी (वॉर्ड क्र. 8) नारायण वानखेडे यांच्या घरी दिनेश सीयाराम शाहू (रा. दरियापूर, जि. फतेहपूर, बिहार) हे पत्नी व चारवर्षीय मुलासह भाड्याने राहत होते. त्यांचा आठवडी बाजारात खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी दिनेश यांच्याकडे बिहार राज्यातूनच रवी नावाच्या व्यक्तीला मदतीसाठी बोलावून घेतले होते. तोदेखील दिनेशच्या कुटुंबासह राहत होता. दिनेशच्या घरी गणपती असल्याने रात्र होऊनही घरात अंधार असल्याचे शेजारच्यांनी दरवाजा ठोठावला. प्रतिसाद मिळत नसल्याने धक्का मारल्यावर दरवाजा उघडा असल्याचे लक्षात आले. घरातील आतल्या खोलीत प्रियांका व चिमुकल्या अंशूलचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. जवळच रक्ताने माखलेला बत्ता पडून असल्याने खून बत्त्याने केल्याचे समोर आले. प्रियांकाची ओढणी दुसऱ्या खोलीत असल्याने मारेकऱ्यासोबत झालेल्या झटापटीत ती पडली असावी असा संशय पोलिसांना आहे. ही माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली. नरखेड पोलिसांना माहिती मिळताचे ठाणेदार मल्लिकार्जुन इंगळे ताफ्यासह दाखल झाले. रात्री आठ वाजता बाजारातून परत घरी आल्यावर या पत्नी व मुलाचा खून झाल्याची दिनेशला माहिती मिळाली. तर त्याच्यासोबत राहणारा रवीदेखील बेपत्ता आहे. या प्रकरणी नरखेड पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला असून पती दिनेशला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी केली जात असून रवीचा देखील शोध पोलिस घेत आहेत. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी भेट दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: murder at narkhed