पोलिसांत तक्रार दिली म्हणून तरुणाचा खून

file photo
file photo

नागपूर : सुरक्षाभिंत पाडल्याची तक्रार पोलिसांत दिल्याच्या कारणावरून लाकडी दांड्याने हल्ला करून करण राजकुमार मेहरा (21, रा. टॉवर लाइनजवळ, जिजामातानगर) या तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना नंदनवन पोलिस ठाण्याअंतर्गत जिजामातानगर परिसरात घडली. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपी श्‍यामा ऊर्फ श्‍यामराव सखाराम गडरिया (48, रा. जिजामातानगर) याला अटक केली असून, त्याच्या 13 वर्षांच्या मुलाला ताब्यात घेतले. आरोपी हे करणच्या शेजारी राहतात. आरोपींचा अवैध दारूविक्रीचा व्यवसाय असल्याचे बोलले जाते. 11 मे रोजी मेहरा परिवार घराच्या सुरक्षा भिंतीला लागून टिनाचे शेड बांधत होते. त्यावेळी आरोपींनी भांडण करून शेड बांधण्यास विरोध केला. त्याविरुद्ध अर्जुन राजकुमार मेहरा व करण मेहरा या दोन भावांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला व आरोपींना समज देऊन सोडले. घरी परतल्यानंतर आरोपींनी पुन्हा रात्री 11.30 वाजता पोलिसांत आपल्याविरुद्ध तक्रार कशी दिली, अशी विचारणा करून भांडण उकरून काढले. त्यानंतर लाकडी दांड्याने दोघाही भावांना मारहाण केली. यात करणच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. त्याला मेडिकलमध्ये दाखल केले असता बुधवारी रात्री मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com