दगडाने ठेचून वीस वर्षीय युवकाचा खून; डोक्यावर आढळल्या जखमा

दगडाने ठेचून वीस वर्षीय युवकाचा खून; डोक्यावर आढळल्या जखमा

उमरखेड (जि. नागपूर) : शहरापासून तीन किलोमीटर अंतरावरील नागपूर तुळजापूर महामार्गावर पैनगंगा नदीच्या पुलाजवळ वीस वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यावर दगडाने ठेचल्याच्या जखमा असल्यामुळे खून झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या घटनेने पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अक्षय वसंतराव करे (वय २०) असे मृत युवकाचे नाव आहे. (Murder-News-Crime-In-Yavatmal-Dead-Body-Found-Wounds-on-the-head-nad86)

शुक्रवारी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर नागपूर तुळजापूर महामार्गावरील पैनगंगा नदीच्या पुलाच्या अलीकडे ज्ञानेश्वर कदम यांच्या शेताजवळ शेतकऱ्यांना मृतदेह आढळला. शेतकऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन, ठाणेदार आनंद वागतकर हे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले.

दगडाने ठेचून वीस वर्षीय युवकाचा खून; डोक्यावर आढळल्या जखमा
शाळेच्या प्रांगणात पोहोचताच शिक्षकांचा उडाला थरकाप

प्रथम दर्शनी युवकाच्या डोक्याला मार लागलेला व गंभीर अवस्थेत दिसला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. या युवकाचा खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिस वर्तुळातून व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात मृताच्या चार मित्रांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार आनंद वागतकर, साहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप गाडे, पीएसआय विनीत घाटोळ, संदीप ठाकूर करीत आहे.

(Murder-News-Crime-In-Yavatmal-Dead-Body-Found-Wounds-on-the-head-nad86)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com