प्रेमप्रकरण, पूर्ववैमनस्यातून दोघांचा खून; यवतमाळी जिल्ह्यातील घटना

प्रेमप्रकरण, पूर्ववैमनस्यातून दोघांचा खून; यवतमाळी जिल्ह्यातील घटना

यवतमाळ-आर्णी : पूर्ववैमनस्यातून डोक्यावर दगड टाकून तरुणाचा खून (The murder of a young man) करण्यात आला. ही घटना शहरापासून काही अंतरावर असलेल्या गोदणी येथे मंगळवारी (ता. एक) दुपारी चार वाजताच्यादरम्यान घडली. तर प्रेमप्रकरणाच्या संशयातून बाप-लेकाने तरुणाचा खून केला (The father-son murdered the young man). ही घटना आर्णी तालुक्यातील अंतरगाव येथे घडली. २४ तासांत झालेल्या दोन खुनांच्या घटनांनी जिल्हा हादरून गेला. (Murder-of-both-in-Yavatmal-district)

सुभाष काशीराम अंजीकर (वय ३६, रा. गोदणी) असे मृताचे नाव आहे. दुपारी तरुण गावातील चिंचेच्या झाडाखाली बसून असताना संशयित सचिन वाघमारे (वय २६, रा. गोदणी) याने डोक्यावर दगडाने प्रहार केला. रक्तबंबाळ अवस्थेत सुभाष कोसळला. अतिरक्तस्राव झाल्याने घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती गावात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. पोलिस पाटील मंगेश मानकर यांनी यवतमाळच्या अवधूतवाडी पोलिसांना घटनेची माहिती दिली. ठाणेदार मनोज केदारे यांच्यासह पथकाने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. वृत्तलिहेस्तोवर गुन्हा नोंद झालेला नव्हता.

प्रेमप्रकरण, पूर्ववैमनस्यातून दोघांचा खून; यवतमाळी जिल्ह्यातील घटना
पैसा, प्रसिद्धीसाठी वाट्टेल ते! ऑनलाइन स्पर्धेत खेळाडूने केली फसवणूक

आर्णी तालुक्यातील अंतरगाव येथे शेख समीर शेख छोटू (वय २०, रा. अंतरगाव) याचा खून करण्यात आला. प्रेम प्रकरणाच्या संशयातून तरुणाच्या डोक्यावर व छातीवर मारहाण करून खून केला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी मृताचा भाऊ शेख अमिन शेख छोटू (वय २२, रा. अंतरगाव) याने आर्णी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पवन विजय राठोड (वय २१) व विजय परसराम राठोड (वय ४५, दोघेही रा. अंतरगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून मंगळवारी आरोपींना अटक करण्यात आली.

दुचाकीने आणले रुग्णालयात

मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने समीर शेख याला दोघांनी दुचाकीवर बसवून उपचारासाठी आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, तपासणी करताच डॉक्टरांनी मृत घोषित केले.

प्रेमप्रकरण, पूर्ववैमनस्यातून दोघांचा खून; यवतमाळी जिल्ह्यातील घटना
मेडिकलमध्ये पॉझोकोनाझोल गोळ्यांचा तुटवडा; बुरशीच्या आजारावर प्रभावी

‘एसडीपीओं’ची घटनास्थळी भेट

प्रेमाच्या संशयातून तरुणाचा खून करण्यात आल्याची माहिती मिळताच घटनेचे गांभीर्य ओळखून पुसदचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी अंतरगाव येथील घटनास्थळासह पोलिस ठाण्यात भेट देऊन घटनाक्रमाची माहिती जाणून घेतली. पुढील कारवाईसंदर्भात पोलिसांना निर्देशही दिलेत.

(Murder-of-both-in-Yavatmal-district)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com