दारू पिण्याच्या कारणावरून नातेवाईकांमध्ये वाद; एकाने दुसऱ्याचा चाकूने भोसकून केला खून

Murder over drinking dispute in Amravati
Murder over drinking dispute in Amravati

अमरावती : नांदगावपेठ नजीकच्या सावर्डी गावात दारू पिण्याच्या कारणावरून नातेवाईक असलेल्या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर एकाने दुसऱ्याचा चाकूने भोसकून खून केला. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावशा उत्तमराव ढोके (वय ४२, रा. बैसपूर, खोलापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. नहींद्र नजरीलाल पवार (रा. सावर्डी) यांच्या तक्रारीवरून नांदगावपेठ पोलिसांनी संशयित आरोपी मनील शैलेराव पवार (वय २०, रा. शेंदोळा)विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. रावशा हा तीन वर्षांपासून नहींद्र याच्याकडे सावर्डी येथे राहत होता.

घटनेच्यावेळी नहींद्र हा कामावर होता. तर मनील व रावशा हे दोघे सावर्डीतच सोबत दारू पिले. त्यानंतर त्या दोघांमध्ये शाब्दिक चकमकीनंतर वाद वाढला. नशेत असताना मनीलने रावशा याच्यावर चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केले. जखमी रावशा याचा जागेवरच मृत्यू झाला. नहींद्र पवार यांनी नांदगावपेठ पोलिसांना घटनेची माहिती दिली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हत्येच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला, असे सहायक पोलिस निरीक्षक दत्ता देसाई यांनी सांगितले. हत्येप्रकरणात अटक मनील पवारला गुरुवारी नांदगावपेठ पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले.

संपादन - नीलेश डाखोरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com