अमरावतीत दगडाने ठेचून पत्नीचा खून; पतीस अटक

सायराबानो अहमद-संतोष ताकपिरे
Saturday, 3 October 2020

आरडाओरड झाल्याने बाहेर असलेली मुले धावत घरी आली व त्यांनी अर्चना हिला वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले. पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयाने दिलेल्या माहितीच्या आधारे मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी हर्षल सुधीर काळे यांच्या तक्रारीवरून सुधीर काळे यास खुनाच्या आरोपाखाली अटक केली.

धामणगाव रेल्वे (जि. अमरावती) : तालुक्‍यातील बोरगाव धांदे येथे चारित्र्यावर संशय घेऊन सुरू असलेला वाद वाढल्यामुळे पतीने पत्नीचा डोक्‍यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना घडली. मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी गुरुवारी (ता. १) पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर नामदेव काळे (वय ४५) असे खुनाचा गुन्हा दाखल पतीचे तर अर्चना सुधीर काळे (वय ३६) असे मृत पत्नीचे नाव आहे. सुधीर हा ऑटो चालवित असून, शेतीचाही व्यवसाय करतो. काही दिवसांपासून त्याचे पत्नी अर्चनासोबत पटत नव्हते. ३० सप्टेंबरला रात्री पत्नी अर्चना ही झोपेत असताना सुधीरने तिच्या डोक्‍यात मोठा दगड घातला.

अधिक वाचा - जेवताना पोळी कधी आणि किती खावी? जाणून घ्या आहारतज्ज्ञ डॉ. कविता गुप्ता यांच सल्ला

आरडाओरड झाल्याने बाहेर असलेली मुले धावत घरी आली व त्यांनी अर्चना हिला वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले. पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयाने दिलेल्या माहितीच्या आधारे मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी हर्षल सुधीर काळे यांच्या तक्रारीवरून सुधीर काळे यास खुनाच्या आरोपाखाली अटक केली. याप्रकरणी अधिक तपास मंगरूळ दस्तगीर पोलिस ठाण्याचे ठाणेदार श्‍याम वानखडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

पुढारी, पोलिसांसह दहा जणांना जुगार खेळताना पकडले

अमरावतीच्या प्रशांतनगर येथील मनपाच्या बगीच्याजवळ असलेल्या शिरभाते कॉम्प्लेक्‍समध्ये फ्रेण्ड्‌स कॉर्नर डेली नीड्‌स या नावाचे एक छोटे हॉटेल्स आहे. सदर दुकान हे संघरक्षक विजय गजभिये यांच्या मालकीचे आहे. येथे गैरकारभार सुरू असल्याच्या तक्रारीवरून सीपींनी कारवाईचे आदेश दिले. या जुगार अड्ड्यावर कारवाई करून पोलिसांनी किरण मधुकर गुडधे, सईद छोटू मुन्नीवाले, अशोक भोजराज जवंजाळ, विलास श्रीधर देशमुख, शुभम संघपाल कांबळे, योगेश ज्ञानेश्वर मोहोड, अविनाश रामराव सोनसने, अमोल मच्छिंद्र नाईकनवरे, संजय गोपाळराव डाखोरे व संघरक्षक विजय गजभिये या दहा जणांना ताब्यात घेतले.

अधिक माहितीसाठी - अंडी, चिकनमध्येच नाही तर या दहा गोष्टीतूनही मिळते प्रोटीन; जास्त ताकदीसाठी करा सेवण

घटनास्थळावरून १९ हजार ६७० रुपयांची रोख रक्कम, ८ मोबाईल, चार दुचाकी, जुगाराचे साहित्य असा एकूण ९४ हजार ७०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. दहापैकी नाईकनवरे व डाखोरे हे दोघे पोलिस कर्मचारी असल्याचे पोलिस निरीक्षक कैलास पुंडकर यांनी सांगितले.

संपादन - नीलेश डाखोरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of wife by stoning in Amravati