चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा केला निर्घृण खून; पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

murder of wife on suspicion of character Husband attempted suicide
murder of wife on suspicion of character Husband attempted suicide

यवतमाळ : पत्नीच्या चारित्र्यावर संशय असलेल्या पतीने झोपेत असलेल्या पत्नीचा निर्घृण खून केला. ही खळबळजनक घटना शहरातील शिवाजीनगर परिसरात उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. मेघना रविराज चौधरी (वय ३०, रा. पिंपळगाव, ता. पुसद) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मेघनाचा संशयित रविराज चौधरी याच्याशी २०१५ मध्ये विवाह झाला. त्यांना सातवर्षीय मुलगा आहे. मात्र, काही महिन्यांपासून रविराज हा मेघनाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यावरून त्या दोघांत सतत भांडण होत होते. रविराज हा २२ फेब्रुवारीला मेघना व मुलासह पुसद तालुक्‍यातील पिंपळगाव येथून यवतमाळ येथील शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या उमेश ठाकरे या त्याच्या जावयाच्या घरी आला होता. तेव्हापासून तो त्याच ठिकाणी होता.

मंगळवारी उमेश ठाकरे हे काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. या दिवशी रात्री उमेश, मेघना व त्यांचा मुलगा घरातील खोलीत झोपून होते. घरातील इतर सदस्य बाहेरच्या खोलीत होते. बुधवारी पहाटे रविराज याने बाहेरगावी गेलेल्या उमेश ठाकरे यांना फोन करून पत्नीला मारून टाकल्याचे सांगितले. त्यावर उमेश ठाकरे यांनी घरी असलेल्या पत्नीला फोन करून याची माहिती दिली. त्यावरून त्यांच्या पत्नीने खोलीत जाऊन पाहिले असता मेघना रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली.

त्याच ठिकाणी संशयित रविराजदेखील बाजूला पडून होता. ही माहिती मिळताच उमेश ठाकरे गावावरून तातडीने यवतमाळच्या घराकडे निघाले. त्यांनी याबाबतची माहिती अवधुतवाडी पोलिसांना दिली. माहिती मिळताच अवधुतवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक मनोज केदारे, सहायक निरीक्षक गजानन गजभारे पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता मृत मेघनाच्या पोटात दोन्ही बाजूला चाकूचे वार केलेले व गळा आवळल्याचे दिसून आले. त्यांनी संशयित रविराज चौधरी (वय ३७, रा. पिंपळगाव, ता. पुसद) याला ताब्यात घेतले.

ठसेतज्ज्ञांच्या पथकाने घेतले नमुने

यवतमाळचे उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बाविस्कर यांनीही तातडीने घटनास्थळी भेट दिली. त्यांनी पाहणी करीत ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्याच्या सूचना दिल्या. ठसेतज्ज्ञांच्या पथकाने घटनास्थळाची तपासणी करून नमुने घेतले. याप्रकरणी उमेश ठाकरे यांनी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विनोद चव्हाण करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com