आर्णी येथील शिवनेरी चौकात भरदुपारी खून

सचिन शिंदे
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

आर्णी (जि. यवतमाळ) : येथील ग्रामीण रुग्णालयाजवळील शिवनेरी चौकातील बाभोरी कॉम्प्लेक्ससमोर शुक्रवारी (ता. 14) दुपारी एकच्यादरम्यान भाजप कार्यकर्त्याचा पैशाच्या वादातून खून झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. नीलेश हिम्मतराव मस्के (वय 35, रा. बालाजी पार्क आर्णी) असे मृताचे नाव असून, या घटनेत त्याचा मित्र जखमी झाला आहे.

आर्णी (जि. यवतमाळ) : येथील ग्रामीण रुग्णालयाजवळील शिवनेरी चौकातील बाभोरी कॉम्प्लेक्ससमोर शुक्रवारी (ता. 14) दुपारी एकच्यादरम्यान भाजप कार्यकर्त्याचा पैशाच्या वादातून खून झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. नीलेश हिम्मतराव मस्के (वय 35, रा. बालाजी पार्क आर्णी) असे मृताचे नाव असून, या घटनेत त्याचा मित्र जखमी झाला आहे.

नीलेश मस्के हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असून, तो शेती करतो. त्याचे वडील हिम्मतराव मस्के हे चिकणी येथील माजी पोलिस पाटील असून, त्यांच्याकडे वडिलोपार्जित शेती आहे. नीलेश व त्याचे तीन मित्र शुक्रवारी दुपारी एकच्यादरम्यान शिवनेरी चौकात आले. त्यांची तालुक्यातील पहूर (नस्करी) येथील संजय यशवंत देठे (वय 47), मिलींद संजय देठे (21) व गुलाब रामराव धकाते (वय 57) यांच्याशी भेट झाली. पैशाच्या वादावरून दोन्ही गटांत बाचाबाची झाली. बाचाबाचीने पर्यावसन हाणामारीत झाले.

आरोपी संजय यशवंत देठे याने लोखंडी सळीने व चाकूने नीलेशवर हल्ला केला. त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. वाद सोडविण्यासाठी गेलेल्या त्याच्या ओम नावाच्या मित्रालाही चाकूचा मार लागला. या झटापटीत गुलाबराव धकाते, मिलिंद देठे या दोघांनाही मार लागला. तर, नीलेशचा मित्र घटनास्थळावरून पळून गेला. नीलेशला नागरिकांनी तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला तातडीने यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची तक्रार नीलेशचा मित्र ओम गजानन बुटले (वय 19, रा. शास्त्रीनगर आर्णी) याने आर्णी पोलिस ठाण्यात दिली असून, ओमवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

घटनास्थळावर पोलिस आले व त्यांनी तिन्ही आरोपींना अटक केली. उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश पांडे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार यशवंत बाविस्कर व पोलिस कर्मचारी तपास करीत आहेत. 

शिवनेरी चौकात बंद

दरम्यान, शहरातील शिवनेरी चौकात ही घटना घडल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांनी खबरदारी घेत शिवनेरी चौकातील दुकाने बंद करून शहरातील नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. 

Web Title: Murder in Yavatmals Aarni also one injured