तरुणाने बहिणीबद्दल काढला अपशबद्ध, रागाच्या भरात भावाने वडिलांच्या मदतीने केला खून

Murder of a young man by crushing a stone in Yavatmal
Murder of a young man by crushing a stone in Yavatmal

नेर (जि. यवतमाळ) : बहिणीबद्दल अपशब्द वापरल्याने तरुणाने बापाच्या मदतीने गावातीलच एका तरुणावर चाकूने वार केला तसेच दगडाने ठेचून खून केला. ही घटना बुधवारी (ता. २६) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास तालुक्‍यातील आजनी येथे घडली. याप्रकरणी नेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल आहे. तसेच संशयित मारेकरी बापलेकास अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवधूत सुमाष इंगळे (रा. आजनी) असे मृताचे नाव आहे. अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींमध्ये यशवंत ऊर्फ रुतिक रामदास पवार (वय २०) व रामदास पवार (वय ४८) दोन्ही रा. आजनी यांचा समावेश आहे. याबाबत मंगला सुभाष इंगळे यांनी नेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

संशयित रुतिकची बहीण ही अवधूतच्या वहिणीसोबत बोलत होती. त्याचवेळी अवधूत याने त्याच्या वहिनीला ‘अशा भंगार लोकांसोबत काय बोलता' असे म्हटले. अशाप्रकारे आपल्या बहिणीबद्दल अपशद्ध बोलल्याचा राग आल्याने रुतिक पवार व त्याचे वडील रामदास पवार हे दोघेही अवधूत याला शोधण्यासाठी त्याच्या घरी गेले. परंतु, तो घरी दिसला नसल्याने दोघेही शेतात गेले. सायंकाळी सातच्या सुमारास त्यांनी अवधूत याच्यावर चाकूने वार केले. त्यानंतर दगडाने ठेचून खून केला.

रात्री आठ वाजताच्या सुमारास अवधूतला शोधण्यासाठी त्याचे कुटुंबीय व शेजारी शेतात गेले असता अवधूत मृतावस्थेत दिसून आला. याबाबतची तक्रार मंगला सुभाष इंगळे यांनी दिल्याने यशवंत ऊर्फ रुतिक रामदास पवार व रामदास पवार या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार ज्ञानेश्वर घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय स्वप्नील निराळे, नरेंद्र लावले, सचिन तंबाखे करीत आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com