युवतीच्या भेटीसाठी आलेल्या युवकाचा खून; मृतदेह मध्यप्रदेशात जाळला

Murder of a young man who came to visit a young woman in Amravati
Murder of a young man who came to visit a young woman in Amravati

अमरावती : वरूड तालुक्‍याच्या रवाळा गावात युवतीच्या भेटीसाठी आलेल्या युवकाचा मध्यप्रदेशच्या सोमगड जंगलात खून करून मृतदेह जाळून टाकला. खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेंदुरजनाघाट पोलिसांनी याप्रकरणी सद्य:स्थितीत अनोळखी व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. विक्रम उर्फ विक्की गायकी (वय २८, रा. धनोडी, ता. वरूड) असे मृत युवकाचे नाव असल्याचे पोलिस निरीक्षक मयुर गेडाम यांनी सांगितले. अठरा दिवसांपूर्वी विक्रम हा ओळखीतील युवतीच्या (वय २४) भेटीसाठी रवाळा येथे येत होता. युवती ही मुळ मध्यप्रदेशातील रहिवासी असून ती काही दिवसांपासून रवाळात नातेवाइकाच्या घरी राहते.

२४ जुलै २०२० रोजी विक्रम उर्फ विक्की हा तिला भेटण्यासाठी रवाळा येथे आला. २५ जुलै रोजी विक्रमच्या नातेवाइकांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार शेंदुरजनाघाट पोलिसात नोंदविली. त्यानंतर २७ जुलै रोजी विक्रमचा मृतदेह मध्यप्रदेश येथील पट्टन ते सोमगड मार्गावरील जंगलात एका पुलाखाली पाइपमध्ये अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळला. मध्यप्रदेशात जनावरे चारणाऱ्यांना घटनेची माहिती कळताच त्यांनी मुलताई पोलिसांना कळविले. त्याच्या शरीरावर घातक शस्त्राचे वार होते.

मध्यप्रदेश पोलिसांनी २७ जुलै २०२० रोजीच अकस्मात मृत्यू अशी नोंद घेतली. मृत व्यक्तीची ओळख पटल्यानंतर घटनास्थळ हे शेंदुरजनाघाट हद्दीत येत असल्याने मध्यप्रदेशच्या पोलिसांनी शेंदुजनाघाट पोलिसांकडे प्रकरण वर्ग केले. मंगळवारी (ता. ११) पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध विक्रमचा खून करून जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस पथक मध्यप्रदेशात

शेंदुरजनाघाट पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक शुभांगी थोरात यांच्यासह तीन जणांचे एक पथक बुधवारी (ता. १२) मध्यप्रदेशात चौकशीसाठी रवाना झाले.

ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचता आलेले नाही
विक्रम उर्फ विक्कीचा खून कुणी व कशासाठी केला याची चौकशी सुरू आहे. अनेकांना चौकशीसाठी बोलविले. परंतु, सद्य:स्थितीत पोलिसांना ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचता आलेले नाही. त्या युवतीचेही बयाण नोंदविले आहे..
- मयुर गेडाम,
पोलिस निरीक्षक, शेंदुरजनाघाट ठाणे

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com