कामठीत युवकाचा खून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

कामठी  : दगडाने ठेचून खून केल्यावर मृतदेह विहिरीत फेकल्याची घटना रविवारी कामठीनजीकच्या खैरी शिवारातील मोहम्मद याकूब चिरामुद्दीन शाह दर्गाजवळ उघडकीस आली. यामुळे खैरी परिसरात खळबळ उडली. खैरी शिवारात मागील दीड महिन्यात अशा प्रकारची ही तिसरी घटना आहे.

कामठी  : दगडाने ठेचून खून केल्यावर मृतदेह विहिरीत फेकल्याची घटना रविवारी कामठीनजीकच्या खैरी शिवारातील मोहम्मद याकूब चिरामुद्दीन शाह दर्गाजवळ उघडकीस आली. यामुळे खैरी परिसरात खळबळ उडली. खैरी शिवारात मागील दीड महिन्यात अशा प्रकारची ही तिसरी घटना आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, कामठी-नागपूर महामार्गावरील खैरी शिवारातील एडेन ग्रीन्झ हॉटेलचे सुरक्षारक्षक नेहमीप्रमाणे रात्रपाळी संपवून नहराकडे शौचास गेले होते. येथे कालव्याजवळ रक्‍ताचे डाग व युवकाचा मृतदेह आढळला. त्याने अन्य सुरक्षारक्षकांना माहिती दिली. अर्धा तासात दुसरा सुरक्षारक्षक धीरज यादव पाहणी करण्यासाठी आला असता त्याला मृतदेह दिसला नाही. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. एसीपी राजेश परदेसी व जुनी कामठीचे ठाणेदार देवीदास कठाळे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करीत असताना रक्ताने माखलेला दगड, मृताच्या चपला सापडल्या तर युवकाचा मृतदेह दर्गाजवळील विहिरीत आढळला. मृतदेह कामठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. मृताच्या शरीरावर फक्त पांढऱ्या रंगाची टीशर्ट होती. चेहऱ्यावर तसेच डोक्‍यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसले. जुनी कामठी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली.
अर्ध्या तासात मृतदेह विहिरीत
सकाळी साडेसात वाजता गजानन ठाकरे या सुरक्षारक्षकाला मृतदेह परिसरात दिसला होता. त्याने लगेच इतरांना याबाबत माहिती दिली. अर्ध्या तासानंतर मृतदेह झुडपातील विहिरीत फेकल्याचे समोर आले. यामुळे आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मारेकरी आसपास असावे, अशीही चर्चा परिसरात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: murdered at kampthi