संपत्तीसाठी आईच्या खुनाचा प्रयत्न

Knief-Attack
Knief-Attack

नागपूर - वडिलोपार्जित संपत्ती नावे करून देत नसल्यामुळे मुलाने वृद्ध मातेवर शस्त्राने हल्ला करून खून करण्याचा प्रयत्न केला. लीलावती केशव रंभाड (४६, रा. चापरे मोहल्ला, तहसील) असे जखमीचे तर दीप केशव रंभाड (२५, रा. व्यंकटेशनगर) असे आरोपीचे नाव आहे.

लीलावती या भावासोबत भूखंड विक्रीच्या व्यवसायात आहेत. पती गडचिरोली येथे सरकारी नोकरीवर आहेत. आरोपी दीप याचे तंत्रनिकेतनपर्यंत शिक्षण झाले असून, तो केशव यांच्यासह पाच वर्षांपासून वेगळा राहतो. काही दिवसांपासून चापरे मोहल्ला येथील घरावरून पती व पत्नीत वाद सुरू आहे. घराची मालकी आपल्याला मिळावी, असा आरोपीचा आग्रह होता. लीलावती घर मुलाच्या नावावर करून देत नव्हत्या.

काही दिवसांपूर्वी त्यांनी ते घर विकायला काढले. त्यामुळे दीप चिडलेला होता. शुक्रवारी सकाळी ४.३० ते ५ च्या सुमारास तो आईच्या घरी पोहोचला. वाद घालून त्याने धारदार शस्त्राने आईच्या छाती, डोके व पायावर अनेक वार करून खुनाचा प्रयत्न केला. यात त्या रक्तबंबाळ झाल्या व कोसळल्या. घरातून किंचाळण्याचा आवाज ऐकून शेजारी मदतीला धावले. त्यावेळी आरोपी पळून गेला. माहिती मिळताच तहसील पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक ए. एस. बकतवार हे घटनास्थळी पोहोचले.

पोटचा गोळा जिवावर उठला
ज्या मुलाला नऊ महिने उदरात वाढवले. ज्याचा तळहातावरील फोडाप्रमाणे सांभाळ केला. तोच पोटचा गोळा आज आईच्या जिवावर उठला. त्याने कोणताही विचार न करता आईचा खून करण्याचा प्रयत्न केला. संपत्तीच्या मोहापायी मुलगा या स्तरापर्यंत जाईल, अशी कल्पनाच न केलेली बरी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com