तुमच्या शुभेच्छांचे फलित सांगण्यास आलोय

तुमच्या शुभेच्छांचे फलित सांगण्यास आलोय
नागपूर : पंचवीस वर्षांपूर्वी अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी नागपूर सोडले अन्‌ संगीत प्रवासाचा प्रारंभ झाला. अनेक नामवंत गायकांच्या आवाजात अल्बम्सची निर्मिती केली. जीवन प्रवासात मित्र, नातलग व आप्तस्वकीयांच्या शुभेच्छांची भक्‍कम साथ मिळाली. आज तुमच्या शुभेच्छांचे काय झाले, हेच सांगायला आलो, असे प्रसिद्ध संगीतकार आशीष मुजुमदार यांनी सांगितले.
मूळचे नागपूरचे असलेल्या आशीष मुजुमदार यांनी 25 वर्षांत शंकर महादेवन, कौशिकी चक्रवर्ती, देवकी पंडित, राहुल देशपांडे, महेश काळे यांच्यासह अनेक ज्येष्ठश्रेष्ठ गायकांच्या आवाजात साठहून अधिक दर्जेदार अल्बम्सची निर्मिती केली. त्यांच्या जीवनप्रवासाचा वेध घेणारा सफरनामा कार्यक्रमाचे आयोजन सप्तकतर्फे करण्यात आले. पर्सिस्टंट कंपनीच्या कविकुलगुरू कालिदास सभागृहात झालेल्या कार्यक्रमात निवेदिका अंकिता देशकर यांनी त्यांची मुलाखत घेतली.
आयुष्यात कधीही संगीताचे तंत्रशुद्ध शिक्षण घेतले नाही. त्यामुळे संगीतसेवेचा गुरू कोण हे कधीच कोणाला सांगू शकलो नाही. संगीताची भाषा मला कळत होती. मुळात मी संगीताशी संवाद साधत यश संपादन केले. नशीब बलवान होतेच; मात्र वेळोवेळी हात धरून पुढे नेणारे गुरू मिळत गेले. 25 वर्षे त्यांच्या नकळत मी अनेक गोष्टी शिकत होतो. हा सगळा योगायोग असला तरी ते माझ्या भाग्यात होते अन्‌ नागपूरकरांचा आशीर्वाद असल्याचे सांगायलाही मुजुमदार विसरले नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com